रस्ते गटारी करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा बार्शीच्या महिलांचा पालिकेला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:15 AM2021-06-11T04:15:53+5:302021-06-11T04:15:53+5:30

बार्शी : मागील चार वर्षांपासून प्रभाग क्रमांक १५ मधील शेंडगे प्लॉट येथील रस्ते अन् गटारी झालेल्या नसून नागरिकांना अनारोग्याला ...

Drain the roads otherwise Barshi women warn the municipality to take to the streets | रस्ते गटारी करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा बार्शीच्या महिलांचा पालिकेला इशारा

रस्ते गटारी करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा बार्शीच्या महिलांचा पालिकेला इशारा

Next

बार्शी : मागील चार वर्षांपासून प्रभाग क्रमांक १५ मधील शेंडगे प्लॉट येथील रस्ते अन् गटारी झालेल्या नसून नागरिकांना अनारोग्याला सामोरे जावे लागत आहे. पालिकेकडून कामे होत नसून प्रशासनाला जाग आणण्यासाठी २० जूनला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी प्रभागातील महिलांनी अमिता दगडे-पाटील यांना दिला आहे.

प्रभागातील महिलांनी २२ ऑगस्ट २०१६ रोजी पालिकेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी पालिकेने तीन महिन्यांत रस्ते, गटारी कामे पूर्ण करू, असे उत्तर दिले होते. आजपर्यंत ते केवळ कागदावरच राहिले आहे.

या प्रभागात ९० टक्के नागरिकांची घरे बांधून पूर्ण झाली आहेत. पण प्रत्येक वादविवाद केल्याशिवाय कोणतीही सुविधा उपलब्ध होत नसल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. दोन वर्षांपूर्वी रस्त्यावर मुरुम अन् खडी टाकून ठेवली आहे पण काम पूर्ण नाही. पालिकेच्या गलथान कारभाराला कंटाळून २० जून रोजी प्रभागातील सर्वजण रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

---

फोटो : १० बार्शी वूमन

बार्शीत प्रभाग क्रमांक १५ मधील समस्यांबाबत मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांना निवेदन देताना सुनीता गायकवाड व इतर महिला.

===Photopath===

100621\img-20210610-wa0011.jpg

===Caption===

फोटो ओळ बार्शी : प्रभाग क्रमांक 15 मधील सुनिता गायकवाड व इतर महिलांनी मुखाधिकारी अमिता दगडे - पाटील यांना निवेदन दिले .

Web Title: Drain the roads otherwise Barshi women warn the municipality to take to the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.