ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांनी नियमांचे पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:47 AM2020-12-05T04:47:12+5:302020-12-05T04:47:12+5:30

टाकळी सिकंदर येथील भीमा साखर कारखाना कार्यस्थळावर वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष धनंजय ...

Drivers transporting sugarcane should follow the rules | ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांनी नियमांचे पालन करावे

ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांनी नियमांचे पालन करावे

Next

टाकळी सिकंदर येथील भीमा साखर कारखाना कार्यस्थळावर वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक होते.सोलापूर जिल्हा वाहतूक शाखा, ग्रामीण पोलीस दल व मोहोळ तालुका पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालक व वाहन मालकांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सायकर, जिल्हा वाहतूक शाखेचे संगोळगी, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे उपस्थित होते.

चेअरमन धनंजय महाडिक म्हणाले, वाहन चालवताना चालकाने मोबाईलचा वापर टाळावा. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी प्रत्येक ट्रेलरला रेडियम रिफ्लेक्टर बसवून घ्यावे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा अपघात होणार नाहीत. यावेळी अधिकारी, कामगार, ऊस वाहतूक करणारे वाहन चालक व मुकादम उपस्थित होते.

Web Title: Drivers transporting sugarcane should follow the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.