गुदमरलेले चौक; सोलापुरातील आसरा चौकात चालवावी लागतात अडथळ्याच्या शर्यतीतून वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 03:16 PM2019-02-08T15:16:25+5:302019-02-08T15:18:33+5:30

काशिनाथ वाघमारे सोलापूर : सिग्नलकडे पाहत सुसाट सुटणारी वाहने...झेब्राक्रॉसिंगच्याही पुढे थांबणारे दुचाकीस्वाऱ़़जड वाहनांची स्पर्धा..त्यात चौकातले कोपरे बेशिस्त रिक्षांच्या थांब्यांनी ...

Driving vehicles in Asura Chowk, Solapur, | गुदमरलेले चौक; सोलापुरातील आसरा चौकात चालवावी लागतात अडथळ्याच्या शर्यतीतून वाहने

गुदमरलेले चौक; सोलापुरातील आसरा चौकात चालवावी लागतात अडथळ्याच्या शर्यतीतून वाहने

googlenewsNext
ठळक मुद्देसकाळी १०़३० ते दुपारी १२़३० आणि सायंकाळी ४़३० ते रात्री ७़३० या वेळेत वाहतुकीचा वेग जास्त भागात औद्योगिक वसाहत, रुग्णालय, शाळा, बाजारपेठ, मंगल कार्यालये असल्याने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : सिग्नलकडे पाहत सुसाट सुटणारी वाहने...झेब्राक्रॉसिंगच्याही पुढे थांबणारे दुचाकीस्वाऱ़़जड वाहनांची स्पर्धा..त्यात चौकातले कोपरे बेशिस्त रिक्षांच्या थांब्यांनी अपघाताला निमंत्रण ठरताहेत, वाहतुकीची समस्या निर्माण करताहेत़़़आसरा चौकातल्या बेशिस्त वाहतुकीला लोकमतच्या चमूने कैद केले.

विजापूर रोड, होटगी रोड, नई जिंदगी आणि विमानतळ परिसराला जोडणाºया चौकातून रिक्षापासून ते जड वाहतूक आणि सायकलीपासून ते मोटरसायकलीपर्यंतच्या सर्वच प्रकारची वाहतूक सुरू असते़ विशेषत: सकाळी १०़३० ते दुपारी १२़३० आणि सायंकाळी ४़३० ते रात्री ७़३० या वेळेत वाहतुकीचा वेग जास्त आहे़ या वेळेत काही वाहनांवर नियंत्रणही करणे अवघड ठरते़ तसेच या भागात औद्योगिक वसाहत, रुग्णालय, शाळा, बाजारपेठ, मंगल कार्यालये असल्याने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

प्रत्येकाला कमी वेळेत चौक पार करण्याची घाई असते़ सिग्नल हिरवा होण्यापूर्वीच काही वाहनस्वार पुढे निघतात. दरम्यान, आधीच पुढे निघालेली वाहने यांच्यामुळे मध्ये अडून राहतात़ काही रिक्षा विकास बँकेसमोरील सिग्नलला चिटकून थांबतात़ मागून येणाºया वाहनांना पुढे सरकता येत नाही़ या रिक्षा चालकांमध्ये प्रवासी मिळवण्यासाठी स्पर्धा लागलेली असते़ यामध्ये काही प्रवासी जीपचीही भर पडते़ 

नागरिक म्हणतात...
यापूर्वी चौकात बेशिस्त वाहतुकीने काही लोकांचा बळी गेला आहे़ याच परिसरात शाळा आहे़ विद्यार्थ्यांना रस्ता पार करताना कसरत करावी लागते़ पुण्यामध्ये अशा चौकात विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी पूल आहे़ असा पूल आसरा चौकात उभारण्याची आवश्यकता आहे़ वाढत्या वाहन संख्येतून वाहतुकीची समस्या निर्माण होणारच आहे़ बीओटी तत्त्वावर हे काम कोणी करु शकेल़
- दीपक डांगे
मुख्याध्यापक, सुरवसे शाळा

बस आणि रिक्षा यांच्यामध्ये कधी-कधी स्पर्धा होते़ रेल्वे पुलावरुन खाली येणारी बरीच वाहने ही सिग्नलच्या कोपºयाला थांबतात, अगदी रस्त्याच्या मधोमधपर्यंत येतात़ मागच्या चारचाकी, दुचाकींना वळून शहरात जायला रस्ताच मिळत नाही़ हीच स्थिती चौकाच्या चारही कोपºयाला जाणवते़ मार्च महिना डोळ्यापुढे ठेवून केवळ दंड आकारुन नियम सांगण्यापेक्षा वाहतूक शाखेने थोडे प्रबोधन करायला हवे़ 
- सिद्धू डिंगणे

जड वाहतूक ही या चौकाला भेडसावणारा प्रश्न आहे़ ऊस वाहतूक, वाळू - खडी वाहतूक, केमिकल आणि सिमेंट वाहतूक आणि कुमठे-होटगी परिसरातील कंपन्या, धान्य गोडावूनला माल पुरवणारी जड वाहने यांची संख्या वाढत चालली आहे़ वेळेचे बंधन घातल्याने थांबून राहिलेली वाहने त्यांच्या वेळात वेगात जातात, इतर वाहनांना चौक पार करता येत नाही़ रिंगरोडचे काम लवकरात लवकर पूर्ण केले नाही तर वाहतुकीची समस्या सुटणार नाही.
- सचिन चौधरी

कुठेही थांबणे हा रिक्षावाल्यांचा ट्रेंड झालाय़ चौकात सिग्नलच्या कोपºयापासूनच रिक्षा लागलेल्या असतात़ त्यांना शिस्तच नसल्याने इतर वाहनांना पुढे जाताही येत नाही, मागच्या वाहनांना वळणही मिळत नाही़ चौकात सिग्नलपासून बँक आॅफ बडोदापर्यंत रिक्षा प्रवाशांसाठी बेशिस्त थांबतात़ वाहतूक पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होते़  हिरवा सिग्नल मिळाला की विमानतळवरुन येणाºया वाहनांना पुढे सरकता येत नाही़ 
- शाम पाटील 

Web Title: Driving vehicles in Asura Chowk, Solapur,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.