रिमझिम पाऊस, हिरवेगार शेत; रेनकोट अन् छत्रीचा वाढला वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 AM2021-07-25T04:20:27+5:302021-07-25T04:20:27+5:30
गेल्या काही वर्षांत तालुक्यात बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया कायम होती. मात्र, गतवर्षीपासून या पट्ट्यात पावसाने हजेरी लावली. यावर्षी सुरुवातीलाच ...
गेल्या काही वर्षांत तालुक्यात बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया कायम होती. मात्र, गतवर्षीपासून या पट्ट्यात पावसाने हजेरी लावली. यावर्षी सुरुवातीलाच पडलेल्या पावसामुळे पठारावर गवत उगवले. त्यानंतर सततच्या रिपरिप पावसामुळे वाऱ्यावर गवत डोलताना दिसत आहे. अनेक वर्षांतून आषाढातील पावसाचा अनुभव तालुक्यात अनुभवावयास मिळत आहे.
या पिकांवर टांगती तलवार
माळशिरस तालुक्यात सध्या रिमझिम पाऊस पडत आहे. मात्र, बहुतांश गावात मोठा पाऊस नसल्यामुळे नाले, ओढे, बंधारे कोरडे आहेत. हा पाऊस काही पिकांना पोषक असला तरी बहुतांश पिकांना धोकादायक ठरणार आहे. या पावसामुळे खरीप पेरणीत अंतर पडले आहे. त्यामुळे खरिपातील पिकांच्या वाढीवर टांगती तलवार दिसणार आहे. फळबागा, भाजीपाल्याबरोबर खरिपातील इतर पिकांनाही वेगवेगळ्या रोगांचा सामना करावा लागणार आहे.