पंढरीत रिमझिम पाऊस... द्राक्ष बागायतदारांमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:39 AM2021-02-18T04:39:44+5:302021-02-18T04:39:44+5:30

: पंढरपुरात बुधवारी रात्री अचानक रिमझिम पावसास सुरुवात झाली. १५ ते २० मिनिटे झालेल्या या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे ...

Drizzling rain ... Panic among grape growers | पंढरीत रिमझिम पाऊस... द्राक्ष बागायतदारांमध्ये घबराट

पंढरीत रिमझिम पाऊस... द्राक्ष बागायतदारांमध्ये घबराट

Next

: पंढरपुरात बुधवारी रात्री अचानक रिमझिम पावसास सुरुवात झाली. १५ ते २० मिनिटे झालेल्या या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मंगळवारपासूनच शहर व तालुक्यात थंडी कमी झाली होती. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते, उकाडाही जाणवत होता. त्यामुळेच उशिरा अचानक विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे शहर व ग्रामीण भागात काही काळ वीज पुरवठा खंडित झाला.

या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, ज्वारीसह रबी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, बोहाळी, कोर्टी, खर्डी, पटवर्धन कुरोली, सुस्ते आदी परिसरात द्राक्षाच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत. या पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

कोट :पावसाचे पाणी द्राक्षावर पडल्यास, द्राक्षांना भेगा पडतात. त्याचबरोबर द्राक्षाचे मनी गळतात. यामुळे व्यापारी द्राक्ष खरेदी करत नाहीत. द्राक्षांना कवडीचा भाव मिळतो, परिणामी पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.

- सूरज टिकोरे,

द्राक्ष बागायतदार, कासेगाव

फोटो

१७पंढरपूर-पाऊस

ओळी

कासेगाव (ता. पंढरपूर) येथे बुधवारी रात्री विजांच्या कडकडाटासह अचानक रिमझिम पाऊस झाला.

माळशिसरमध्ये रबी पिकांना धोका

माळशिरस तालुक्यात रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा ही पिके जोमाने आली आहेत. काही ठिकाणी काढणी सुरू झाली आहे. त्यात बुधवारी रात्री अचानक रिमझिम पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोर गळण्याची शक्यता आहे. तसेच द्राक्ष मण्यांवर पावसाचे थेंब पडल्यानंतर ते सडण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Drizzling rain ... Panic among grape growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.