सोलापूर जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवर धान्याचा ‘दुष्काळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 03:28 PM2018-10-20T15:28:35+5:302018-10-20T15:30:02+5:30

मंजूर केंद्रांवर धान्य खरेदी होईना; पाच केंद्र मंजुरीचे प्रस्ताव अधांतरीच

'Drought' at the Centers of Solapur District | सोलापूर जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवर धान्याचा ‘दुष्काळ’

सोलापूर जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवर धान्याचा ‘दुष्काळ’

Next
ठळक मुद्देकाही ठिकाणी आलेल्या धान्याची विक्रीअभावी परवड सुरू पाच केंद्रांवर आॅनलाईन नोंदणीही  सुरू झाली नाहीदोन केंद्रांवर नोंदणी होऊनही धान्य खरेदीच झाली नाही

सोलापूर : पाऊस नसल्याचे परिणाम खोलवर गेल्याचे जाणवू लागले आहे. उडीद, मूग व सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात तब्बल ७ हमीभाव केंदे्र प्रस्तावित असली तरी मंजूर असलेल्या अक्कलकोट व उत्तर तालुक्याच्या केंद्रांवर धान्याची खरेदी सुरू झाली नाही. अन्य पाच केंद्रे मंजुरीसाठी संस्थांचे शासनाकडे गेलेले प्रस्ताव मंजुरीविना अधांतरीच अडकले आहेत. धान्याची आॅनलाईन नोंदीसाठी अवघे ५ दिवस शिल्लक असताना हमीभाव केंद्रावर धान्याचा दुष्काळ दिसत आहे.

 शेतीमालाची आवक झाली की बाजारात दराची घसरण सुरू होते. हे नित्याचेच आहे. शेतीमालाची ºहास एकाचवेळी सुरू होते व  पैशाची गरज असल्याने शेतकरी धान्य बाजारात विक्रीला आणतात. खरीप हंगामातील धान्य बाजारात येण्याच्या सुरुवातीला उडीद, मूग, मका, सोयाबीन आदींना बºयापैकी दर असतो. नंतर मात्र दराची घसरण होते. दर परवडणारा नसला तरी बºयापैकी दर मिळत असल्याने शेतकरी धान्य विक्रीला आणतात, शेतकºयांकडून धान्याचा ओघ सुरू झाली की दराची घसरण सुरू होते. हे टाळण्यासाठी शासनाकडून हमीभाव केंद्रे सुरू केली जातात.

शेतकºयांनी उडीद, मूग, मका,  सोयाबीन व अन्य धान्याची हमीभाव केंद्रासाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागते. नोंदणी केलेल्या धान्याचीच हमीभाव केंद्रावर खरेदी केली जाते. यावर्षी उडीद, मूग या धान्याची आॅनलाईन नोंदणीची मुदत २५ सप्टेंबर ते २४ आॅक्टोबर तर सोयाबीनची  ३१ आॅक्टोबरपर्यंत शासनाने दिली आहे.

या मुदतीत फक्त लिंबीचिंचोली(सोलापूर) केंद्रात उडीदसाठी ५८ तर मूगसाठी २१, सोयाबीन २ व अक्कलकोट या केंद्रावर उडीद १११ व मुगासाठी २१ अशा दोन केंद्रावर २१३ शेतकºयांनी नोंद केली आहे. प्रत्यक्षात धान्य खरेदीला सुरुवात झाली नाही.  करमाळा, बार्शी, मंगळवेढा, कुर्डूवाडी व माळकवठे(दक्षिण सोलापूर) या ठिकाणी हमीभाव केंद्र खरेदीसाठी संस्था मंजुरीच शासनाने अद्याप केली नसल्याचे सांगण्यात आले. खरीप शेतीमाल नसल्याचीही हमीभाव केंद्र मंजुरीची अडचण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाच केंद्रांवर आॅनलाईन नोंदणीही  सुरू झाली नाही तर दोन केंद्रांवर नोंदणी होऊनही धान्य खरेदीच झाली नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे उडीद, मूग, सोयाबीन, मका व अन्य खरीप पिके वाया गेली आहेत. काही ठिकाणी आलेल्या धान्याची विक्रीअभावी परवड सुरू आहे. 

खरीप हंगाम संपला..
- सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, करमाळा, बार्शी, मंगळवेढा, कुर्डूवाडी, सोलापूर बाजार समिती (उत्तर सोलापूर) व माळकवठे(दक्षिण सोलापूर) येथे हमीभाव केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित होते. 
- अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खरीप पिके असतात त्यामुळे अक्कलकोट व दुधनी या ठिकाणी हमीभाव केंदे्र सुरू केली जातात; मात्र यावर्षी दुष्काळामुळे खरीप हंगाम संपला तरी मंजूर असलेल्या अक्कलकोट केंद्रावरही धान्याची खरेदी सुरू नाही.
- मूग प्रतिक्विंटल ५ हजार ६०० रुपये, उडीद प्रतिक्विंटल ६ हजार ९७५ रुपये, मका १७०० रुपये क्विंटल तर सोयाबीनची खरेदी ३३९९ रुपयाने केली जाणार आहे. 

Web Title: 'Drought' at the Centers of Solapur District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.