आचारसंहितेमुळे सोलापूर जिल्हा परिषदेमधील कर्मचाºयांच्या बदल्या लांबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 04:09 PM2019-05-22T16:09:46+5:302019-05-22T16:11:57+5:30
सोलापूर : लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या बदल्या लांबल्या आहेत. शासन परिपत्रक न मिळाल्यामुळे अद्याप बदल्यांची प्रक्रिया ...
सोलापूर : लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या बदल्या लांबल्या आहेत. शासन परिपत्रक न मिळाल्यामुळे अद्याप बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली नसली तरी प्रशासनाने तयारी केली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमधील विविध विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची मे अखेर तयारी करण्यात येते. यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया लांबली आहे. शासनाने बदल्यांबाबतचे परिपत्रक जारी केले असले तरी अद्याप जिल्हा परिषदेला मिळाले नसल्याची माहिती प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी दिली. असे असले तरी प्रशासनाने सर्व विभागांकडून बदलीपात्र कर्मचाºयांची यादी मागविलेली आहे. आचारसंहितेचा अंमल संपल्यानंतर बदली प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे बदलीपात्र कर्मचारी व अधिकाºयांची धावपळ वाढली आहे.
ग्रामविकास विभागाने २१ मे रोजी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांतर्गत परिपत्रक जारी केले आहे. २५ मेपर्यंत बदलीपात्र शिक्षकांची माहिती संगणक प्रणालीत नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यानंतर ही सुविधा बंद होणार आहे. त्यानंतर ३0 मेपर्यंत शिक्षकांना फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गेल्या वेळेस संगणक प्रणालीत बदल्यांवरून गोंधळ झाला होता. या वेळेस सर्व शिक्षकांचे मॅपिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला फक्त बदलीपात्र नव्हे तर सर्व शिक्षकांची माहिती संकलित करावी लागणार आहे.
‘त्या’ शिक्षकांना मिळेल न्याय
- चुकीची माहिती भरून मागील वर्षी बदली करून घेतलेल्या दोषी शिक्षकांना संगणक प्रणालीत मॅप करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कारवाई केली असेल तर त्या शिक्षकांना या सुविधेत मॅप करू नये. त्या शिक्षकांसंबंधीत शाळेची एक जागा रिक्त दाखविणे गरजेचे आहे. गतवेळेसारखे यावर्षी शिक्षक बदलीत गोंधळ होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले.