कोरोनामुळे यंदाही आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपातच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 06:04 AM2021-07-01T06:04:39+5:302021-07-01T06:05:13+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन

Due to the corona, Ashadhi Wari is still symbolic this year | कोरोनामुळे यंदाही आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपातच

कोरोनामुळे यंदाही आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपातच

googlenewsNext
ठळक मुद्देआषाढी वारी नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ढोले म्हणाले, आषाढी वारी ही कोरोनाच्या संकटकाळात पार पडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 
पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी संप्रदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात येणार आहे.  ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे, ते पालखी सोहळे बसने पंढरपुरात दाखल होतील. इतर कोणत्याही पालखी, दिंडी तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात येऊ नये,  असे आवाहन  प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.

आषाढी वारी नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ढोले म्हणाले, आषाढी वारी ही कोरोनाच्या संकटकाळात पार पडत आहे.  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालखी सोहळ्याबात  शासन स्तरावर निर्णय घेण्यात आलेला असून, वारी प्रतीकात्मक स्वरूपात पार पाडण्यासाठी देण्यात आलेली जबाबदारी समन्वयाने पार पाडावी. 

पायी वारीसाठी भजन आंदोलन
nसोलापूर/मुंबई : शासन निर्णयात बदल करून आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येण्यासाठी किमान ५० भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी, आषाढी पायी वारीला परवानगी द्यावी, या मागणीसाठी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने मुंबईत आझाद मैदानावर भजन आंदोलन करण्यात येत आहे. 
nआषाढी वारीत वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, जिल्हाध्यक्ष जोतिराम चांगभले, शहराध्यक्ष संजय पवार, गोविंद ताटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Due to the corona, Ashadhi Wari is still symbolic this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.