भ्रष्ट्र या शब्दाला आक्षेप घेतल्याने सोलापूर महापालिकेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:59 PM2018-05-11T12:59:17+5:302018-05-11T12:59:17+5:30

परिवहन कर्मचाºयांनी सुरू असलेल्या आंदोलनास पाठींबा देत काँग्रेस व बसपा सदस्यांनी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी सभागृहात महापौर शोभा बनशेट्टी यांना काळे झेंडे दाखविले.

Due to corrupt words or words, Sholapur in municipal corporation | भ्रष्ट्र या शब्दाला आक्षेप घेतल्याने सोलापूर महापालिकेत गदारोळ

भ्रष्ट्र या शब्दाला आक्षेप घेतल्याने सोलापूर महापालिकेत गदारोळ

googlenewsNext
ठळक मुद्देथकीत वेतनासाठी परिवहन कर्मचाºयांचे आंदोलन सुरूआंदोलनास काँग्रेस व बसपाचा पाठींबागोंधळ घातल्यास कायदेशीर कारवाई करू : आयुक्त

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका परिवहन कर्मचाºयांचे नऊ महिन्यांचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी परिवहन कर्मचाºयांनी सुरू असलेल्या आंदोलनास पाठींबा देत काँग्रेस व बसपा सदस्यांनी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी सभागृहात महापौर शोभा बनशेट्टी यांना काळे झेंडे दाखविले.

यावर महापौरांनी झेंडे व फलक हटवा सर्वांना बोलण्याची संधी दिली जाईल असे सांगितले़ यावर महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी मला बोलायचे आहे अशी सभागृहाची अनुमती मागितली़ आमचे झाल्यावर बोला सभागृहात नवीन पायंडा नको अशी भूमिका बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांनी घेतली़ यावर महापौरांनी सभागृहनेते संजय कोळी यांच्याशी चर्चा केली आहे़ कोळी यांनी आयुक्तांना निवेदन करायचे आहे असे सांगितल्यानंतर सर्वजण शांत बसले़

महापालिका आयुक्त डॉ़ अविनाश ढाकणे यांनी आंदोलनकर्त्यां सदस्यांच्या अंगावर घातलेल्या जॅकेटवर भ्रष्ट आयुक्त असे लिहिले आहे़ त्याचा खुलासा करावा अन्यथा मला कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशारा दिला़ त्यावर काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे संतप्त झाले़ ही काय हुकुमशाही आहे काय ?

लोकशाहीमध्ये आम्ही काहीही म्हणणे मांडू़़क़रा कारवाई मी जेलमध्ये बसायला तयार आहे असे म्हणताच सभागृहात गोंधळ सुरू झाला़ शेवटी अ‍ॅड़ यु़ एऩ बेरिया यांनी मध्यस्थी केली़ आयुक्तांनी ही बाब वैयत्यिक घेऊ नये, चेतन नरोटे व रियाज हुंडेकरी यांच्या अंगावर असलेले ते वादग्रस्त जॅकेट काढला जाईल असे सांगितले़ त्यावर दोघांनीही जॅकेट काढून टाकल्यावर प्रकरण शांत झाले़

Web Title: Due to corrupt words or words, Sholapur in municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.