पहाटेच्या पावसात खळाळले सोलापूर जिल्ह्यातील ओढे-नाले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 03:43 PM2019-06-10T15:43:57+5:302019-06-10T15:58:23+5:30
शेतकºयात आनंद : पेरणीसाठी आणखीन एका जोरदार पावसाची प्रतीक्षा, मान्सूनपूर्व आगमनाने शेतकºयांना दिलासा
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात रविवारी पहाटे झालेल्या पावसाने ओढे-नाल्यात पाणी वाहिल्याने ते खळाळले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी-संगदरी परिसरात रविवारी सकाळीच दमदार पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड तास कमी जास्त प्रमाणात पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी चांगलेच पाणी वाहून गेले. जून महिन्याच्या पहिल्या आठ दिवसानंतरच पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकºयात आनंद पसरला आहे. खरीप पेरणीसाठी आणखीन एका दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
मागील वर्षी या भागात पावसाने पाठ फिरवल्याने या परिसरात यंदा गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
रविवारी सकाळी सहा ते साडेसात दरम्यान या परिसरात पाऊस पडला.संगदरी, मुस्ती, धोत्री परिसरात पावसाचा चांगला जोर दिसून आला. यामुळे जलयुक्त शिवार योजनेतून घेण्यात आलेल्या ओढे व नाल्यातून पाणी वाहतानाचे चित्र यावेळी दिसून आले. शेतकºयांच्या रानातही पाणी थांबल्याचे चित्र सकाळी या परिसरात दिसून आले.
खरीप पेरणीसाठी पेरणीयोग्य ओलावा जमिनीत असावा लागतो. उन्हाळ्यात जमीन चांगलीच तापल्याने जमिनीत असलेल्या मातीत ओलावा निर्माण होण्यासाठी दोन-तीन चांगल्या पावसाची गरज असते. रविवारी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे एक-दोन दिवसात आणखीन एक असाच दमदार पाऊस पडला तर या परिसरातील शेतकºयांकडून पेरणी करण्यात येणार आहे. पेरणीपूर्व मशागती पूर्ण झाल्या असून आणखीन पाऊस पडला तर लगेच पेरणी सुरू करण्यात येणार असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले. बोरामणी परिसरात द्राक्ष, पडवळ आदी बागायती पिके घेण्यात येतात; मात्र मागील वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कोणतीच पिके शेतकºयांकडून घेण्यात आली नाहीत. जूनमध्ये चांगला पाऊस झाला तर येथील शेतकरी पडवळ, दोडके,कारले, कोव्हाळे आदी प्रकारचा भाजीपाला उत्पादन करण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबई व पुणे येथील बाजारात अशा प्रकारचा भाजीपाला विकण्यात येथील शेतकºयांची चांगलीच ख्याती आहे.
सांगोल्यात हाल
कडलास, आलेगाव, वाकी घेरडी, वाणीचिंचाळे, मंगेवाडी कमलापूर अजनाळे, चिणके येथील चारा छावण्यांमध्ये अचानक सुटलेल्या वादळी वाºयामुळे निवाºयाचे शेड उडून गेले. काही ठिकाणी पडले. यामुळे पशुपालकांचे हाल झाले. यामुळे पशुपालकांना निवारा शोधत पावसातच थांबावे लागले.
कोर्टीच्या छावणीतील छप्पर वादळाने पडले
कोर्टी : करमाळा तालुक्यातील कोर्टी परिसरात रविवारी पहाटे वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात कोर्टीतील चारा छावण्यामध्ये असलेले निवाºयाचे छप्पर पडल्याने शेतकºयांचे साहित्य भिजून गेले आणि त्यांना पावसात भिजतच थांबावे लागले.
वादळी वाºयासोबत आलेल्या पावसाने कोर्टी, पोंधवडी, राजुरी या गावांत हजेरी लावली. दरम्यान, यंदाच्या मोसमातला हा पहिलाच पाऊस असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मेघगर्जनेसह झालेल्या पावसात विजेचा मोठ्या प्रमाणात कडकडाट सुरू होता. कोर्टीमधील काही शेतात पाणी साचले. तसेच वादळामुळे चारा छावण्यामधील अनेक छप्पर पडल्याचे चित्र होते.
केत्तूरकरांना पावसाचा दिलासा
केत्तूर : दोन दिवसांपूर्वी पावसाचा पहिला शिडकावा झाल्यानंतर रविवारी पावसाने केत्तूर परिसरात दमदार हजेरी लावली. गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाची वाट पाहत असलेल्या बळीराजाला आजच्या पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उजनीच्या पाण्याने तळ गाठला असल्याने पिकांना पाणी पुरवता पुरवता शेतकºयांचे पार आर्थिक कंबरडे मोडले होते. गाळात उतरून विद्युत पंपाला पाणीपुरवठा करावा लागत होता. काही उजनीच्या कडेला अनेक ठिकाणी सामूहिक चाºया खोदून पाणीपुरवठा करण्याचे काम रात्रंदिवस चालू होते. पण आज केत्तूर, पारेवाडी, पोमलवाडी या भागात अर्धा तास पावसाने हजेरी लावल्याने सुकून चाललेल्या पिकांना नवसंजीवनीच मिळाली आहे.
शिंदेवाडीत दीडशे कोंबड्या दगावल्या
माढा : परिसरात रविवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली असून, यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते. शिंदेवाडी येथील किशोर अभिमान शिंदे यांच्या पोल्ट्री फार्ममधील शंभर ते दीडशे कोंबड्यांची पिल्लं दगावल्याची घटना घडली आहे. माढा परिसरातील दारफळ, उंदरगाव, मानेगाव, विठ्ठलवाडी, उपळाई, वडशिंगे, रिधोरे, सापटणे, वेताळवाडी, शिंदेवाडी, जाधववाडी, निमगाव, सुलतानपूर, महातपूर, अंजनगाव, केवड, जामगाव, विठ्ठलवाडी, लोंढेवाडीसह परिसरात पाऊस पडला आहे.
कुर्डूवाडीत विजेच्या कडकडाटासह पाऊस
कुर्डूवाडी शहर व परिसरात पहाटे पाच ते सहाच्यादरम्यान विजा चमकून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. ८.४ मी. मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या कुर्डूवाडीकरांना सुखद धक्का दिला. यामुळे वातावरणाचे तापमान काही प्रमाणात कमी झाले असून शेतकºयांच्या चेहºयावर हसू फुलले आहे.