सोलापूरात डेंग्यूचा विळखा तरीही प्रशासनाकडून आकड्यांची धूळफेक, खासगी पॅथॉलॉजीतील नोंदी कुठे गेल्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:19 PM2017-11-07T13:19:48+5:302017-11-07T13:21:41+5:30

एकीकडे रुग्णालयात दिसणारी गर्दी आणि दुसरीकडे सरकारी कागदांवरील नगन्य आकडा पाहता ही धूळफेक नेमकी आहे तरी कशासाठी, असा प्रश्न आता पडायला लागला आहे.

Due to the dengue detected in Solapur, however, where did the statistics from the administration of the dust, private pathology records? | सोलापूरात डेंग्यूचा विळखा तरीही प्रशासनाकडून आकड्यांची धूळफेक, खासगी पॅथॉलॉजीतील नोंदी कुठे गेल्या ?

सोलापूरात डेंग्यूचा विळखा तरीही प्रशासनाकडून आकड्यांची धूळफेक, खासगी पॅथॉलॉजीतील नोंदी कुठे गेल्या ?

Next
ठळक मुद्देवर्षभरात फक्त २१६ लोकांनाच डेंग्यू झाल्याची नोंद सरकारी कागदांवरील नगन्य आकडा पाहता ही धूळफेक नेमकी आहे तरी कशासाठीसंपूर्ण जिल्ह्याला डेंग्यूचा विळखा पडल्यासारखी स्थिती


गोपालकृष्ण मांडवकर
सोलापूर दि ७ : संपूर्ण जिल्ह्याला डेंग्यूचा विळखा पडल्यासारखी स्थिती आहे. मागील चार महिन्यांपासून सर्व दवाखाने डेंग्यू, चिकन गुनियाच्या रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. स्वाईन फ्लूसारख्या आजाराने आतापर्यंत पाच जण दगावले आहेत. खुद्द एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यूही या आजाराने झाला आहे. असे असले तरी आरोग्य विभागाच्या कागदावर मात्र वर्षभरात फक्त २१६ लोकांनाच डेंग्यू झाल्याची नोंद आहे. एकीकडे रुग्णालयात दिसणारी गर्दी आणि दुसरीकडे सरकारी कागदांवरील नगन्य आकडा पाहता ही धूळफेक नेमकी आहे तरी कशासाठी, असा प्रश्न आता पडायला लागला आहे.
मागील जुलै-आॅगस्ट महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात डेंग्यूने डोके वर काढले आहे. याच काळापासून स्वाईन फ्लूच्या आजाराचीही दहशत आहे. पंढरपूर तालुक्यातील एका जोडप्याला स्वाईन फ्लू झाल्याने पुण्यातील रुग्णालयात मृत्यू झाल्याची नोंद आहे. २०१७ मधील हा स्वाईन फ्लूचा जिल्ह्यातील पहिला बळी असला तरी हे सत्य लपविण्याचा खटाटोप मात्र आरोग्य विभागाकडून सातत्याने सुरू आहे.
आरोग्य विभाग आणि जिल्हा हिवताप विभागाच्या शासकीय आकडेवारीनुसार, सोलापूर जिल्ह्यात या वर्षभरात फक्त २१६ जणांनाच डेंग्यू झाला आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आरोग्य विभागाला फक्त ६३२ रुग्ण संशयित आढळले. त्यातील २१६ जणांनाच डेंग्यू झाला होता, अशी नोंद आरोग्य विभागाच्या कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात ग्रामीण भागात परिस्थिती वेगळी आहे. दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मोहोळ या तालुक्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. या तालुक्यांसह अन्य तालुक्यांतून सोलापुरात आणि तालुका मुख्यालयातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या अधिक आहे. असे असतानाही केवळ आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाºया रुग्णांचे तेवढे आकडे सादर करून वस्तुस्थिती लपविण्याचा प्रकार आरोग्य विभागाकडून सुरू आहे.
---------------------
खासगी पॅथॉलॉजीतील नोंदी कुठे गेल्या?
नियमानुसार सर्वच पॅथॉलॉजीचालकांना त्यांच्याकडे परिक्षणासाठी येणाºया रक्ताचा अहवाल आरोग्य विभागाला सादर करणे बंधनकारक असते. दररोज सायंकाळी हा अहवाल संबंधित यंत्रणेमार्फत सादर करणे आणि त्यानंतर साप्ताहिक अहवाल देणे हा यातील महत्वाचा भाग असतो. मात्र काही अपवाद वगळता अनेक पॅथालॉजी सेंटरकडून नियमित अहवाल येतच नाहीत. एवढेच नाही तर आरोग्य विभागालाही हा अहवाल मिळविण्यात स्वारस्य वाटत नाही. परिणामत: खासगी पॅथालॉजी आणि खासगी रुग्णालयात गर्दी अधिक दिसत असूनही रुग्णांचा खरा आकडा आरोग्य विभागाला मांडता येत नाही.

Web Title: Due to the dengue detected in Solapur, however, where did the statistics from the administration of the dust, private pathology records?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.