नळदुर्ग, कुरनुर धरणातील विसर्गामुळे अक्कलकोट तालुक्यातील बोरी हरणा नदीला महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 09:00 AM2021-09-28T09:00:47+5:302021-09-28T09:01:33+5:30

अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

Due to discharge from Naldurg, Kurnoor dam, flood in Bori Harna river in Akkalkot taluka | नळदुर्ग, कुरनुर धरणातील विसर्गामुळे अक्कलकोट तालुक्यातील बोरी हरणा नदीला महापूर

नळदुर्ग, कुरनुर धरणातील विसर्गामुळे अक्कलकोट तालुक्यातील बोरी हरणा नदीला महापूर

googlenewsNext

अक्कलकोट/ सोलापूर : रामपूर, उमरंगे (ता.अक्कलकोट) येथील बोरी हरणा नदीला महापूर आला आहे.

नदीच्या पुलावर पाच फूट पाणी सोडण्यात आले आहे. कुरनुर, नळदुर्ग येथून मोठ्या प्रमाणात पाण्याचे विसर्ग होत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मागील वर्षी याच ठिकाणी महापूर येऊन शेतीपिकाचे नुकसान झाले होते. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील अन्य मंत्र्यांनी या नदी ठिकाणाला भेट दिली होती. 

या महापुरामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून परराज्यातील अनेक गाड्या या मार्गावरच अडकून पडल्या आहेत. 

Web Title: Due to discharge from Naldurg, Kurnoor dam, flood in Bori Harna river in Akkalkot taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.