लग्नकार्यात शिल्लक राहिलेली खीर दुसºया दिवशी खाल्ल्यामुळे सलगर येथे ५५ जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:16 PM2018-12-19T13:16:43+5:302018-12-19T13:18:12+5:30
लग्नकार्यातील खीर दुसºया दिवशी खाल्ली
अक्कलकोट: लग्नकार्यात शिल्लक राहिलेली खीर दुसºया दिवशी खाल्ल्यामुळे सलगर (ता. अक्कलकोट) येथील ५० ते ५५ जणांना विषबाधा झाली. या सर्वांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
सलगर येथे दि. १७ डिसेंबर रोजी चंद्रकांत धडके यांच्या घरी लग्नकार्य होते. लग्नातील भोजन आटोपल्यानंतर शिल्लक राहिलेली खीर त्यांनी गावातील ग्रामस्थांना वाटली. ही खीर त्यांनी दुसºया दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत खाल्ली. त्यानंतर सर्वांना उलट्या व जुलाबाचा त्रास जाणवू लागला. तत्काळ सरपंच सुरेखा गुंडरगी, उपसरपंच राजकुमार जमादार, पोलीस पाटील बिराजदार यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी अक्कलकोट येथे ग्रामीण रुग्णालयात हलविले. वयोवृद्ध १६ रुग्णांना मात्र उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले. सर्व जणांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक राठोड यांनी सांगितले.
विषबाधा झालेल्यांमध्ये शरदा धडके,कस्तुरबाई धडके, जयश्री कोळी, नसीमा बिराजदार, भाग्यश्री कोळी, निगवव्वा संगोळीगी,अमिना लालखा, रामचंद्र कोळी, अभिमन्यू जोगदे, कमल होटकर,निलाबाई कोळी, जरीना मुजावर, शिलवंती कोळी, कस्तुरबाई हडलगी, तुकाबाई चिकमळळी, सावित्री भडोळे, अंबिका नरुणे, नागम्मा जनवडे, कालव्वा कोळी, लक्ष्मण कोळी, हलीम गुळळो, श्रीशैल म्हेत्रे, रुकमबी गुळळो, मल्लिनाथ कोळी, नागम्मा कोळी, महानंदा कोळी, सावित्री कोळी, निलम्मा कोळी, शशिकांत कोळी, लक्ष्मीकांत कोळी, रामचंद्र कोळी असे ५० ते, ५५ रुग्ण बाधित आहेत.
रुग्णालयाची तारांबळ
- अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयाची रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता ३० इतकी आहे. मात्र अचानक ५५ रुग्ण दाखल झाल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये वयोवृद्ध, महिला, मुले यांचा समावेश आहे.