अधिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी भगवान मुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:41 AM2021-02-21T04:41:52+5:302021-02-21T04:41:52+5:30
पंढरपूर अधिवक्ता संघाच्या निवडणुकीसाठी ३९८ मतदार पात्र आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ज्येष्ठ वकिलांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. ...
पंढरपूर अधिवक्ता संघाच्या निवडणुकीसाठी ३९८ मतदार पात्र आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ज्येष्ठ वकिलांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही तरुण वकिलांच्या हट्टापायी ही निवडणूक लावण्यात आली. त्यामुळे चुरशीने मतदान झाले. शनिवारी सकाळी ११ ते ३ या वेळेत मतदान होऊन मतमोजणी दुपारी ४ वाजता पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी ॲड. भगवान मुळे ६१ मतांनी, उपाध्यक्षपदी ॲड. विकास भोसले ९६ मतांनी, सहसचिव व्ही. एन. साळुंखे १४ मतांनी विजयी झाले, तर सचिवपदी सोमेश चांडोले यांची बिनविरोध निवड झाली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून विजयकुमार नागटिळक, संदीप रणवरे यांची निवड करण्यात आली. पराभूत उमेदवारांमध्ये ॲड. अर्जुन पाटील, महेश कसबे यांचा समावेश आहे.
विजयानंतर विद्यमान पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष ॲड. भगवान मुळे, उपाध्यक्ष विकास भोसले, सचिव सोमेश चंडोले, सहसचिव व्ही. एन. साळुंखे, कार्यकारिणी सदस्य ॲड. विजयकुमार नागटिळक, ॲड. संदीप रणवरे यांच्यासह अधिवक्ता संघाचे आजी-माजी पदाधिकारी, वकील उपस्थित होते.