गारांच्या पावसामुळे करकंबमध्ये पिके झाली आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:17 AM2021-06-01T04:17:03+5:302021-06-01T04:17:03+5:30

करकंबमध्ये दुपारी २० मिनिटांच्या कालावधीत पाऊस कमी गारा जास्त पडल्या. यामध्ये येथील अर्जुन देशमुख यांच्या दोन एकर द्राक्षबागेसह तुकाराम ...

Due to hailstorm, the crops in Karkamba were horizontal | गारांच्या पावसामुळे करकंबमध्ये पिके झाली आडवी

गारांच्या पावसामुळे करकंबमध्ये पिके झाली आडवी

Next

करकंबमध्ये दुपारी २० मिनिटांच्या कालावधीत पाऊस कमी गारा जास्त पडल्या. यामध्ये येथील अर्जुन देशमुख यांच्या दोन एकर द्राक्षबागेसह तुकाराम देशमुख, सौदागर देशमुख यांच्या बागेच्या कोवळ्या काड्या मोडून पडल्या, तर पाने फाटून गळून पडली. सुरेश नागणे यांच्या नवीन दोन एकर द्राक्ष बागेला फटका बसला. आनंद देशमुख, ज्ञानेशवर देशमुख, दत्तात्रय देशमुख, दत्तात्रय ननवरे, फासे, सौदागर देशमुख यांच्या पपईच्या बागेची पाने फाटून दांडे आणि पपई शिल्लक राहिली आहेत. दगडू खारे यांची केळीची बाग भुईसपाट झाली आहे. नेमतवाडी रोडवर नलवडेवस्ती येथे बाभळीचे झाड उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

फोटो ओळी ::::::::::::::::::

करकंब परिसरात गारांच्या पावसामुळे द्राक्ष बागांची पाने फाटल्याचे चित्र.

Web Title: Due to hailstorm, the crops in Karkamba were horizontal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.