उच्चांकी साखर उतारा निघत असल्याने देता येतोय उसाला अधिकचा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:27 AM2021-02-25T04:27:33+5:302021-02-25T04:27:33+5:30
पाडुरंग कारखान्याने चालू हंगामात आजअखेर ८ लाख २४ हजार मे. टन उसाचे गाळप करून ८ लाख ९२ हजार ५६० ...
पाडुरंग कारखान्याने चालू हंगामात आजअखेर ८ लाख २४ हजार मे. टन उसाचे गाळप करून ८ लाख ९२ हजार ५६० साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. १०.८२ टक्के साखर उतारा घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये अव्वलस्थान पटकावले आहे. २३ फेब्रुवारीअखेर ऊस गाळपाचा अहवाल साखर आयुक्तांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात १२७ लाख ९२ हजार मे. टनाचे उसाचे गाळप करून ११८ लाख साखर पोत्यांचे उत्पादन घेत ९.२६ टक्के साखर उतारा निघाला आहे.
सहकार महर्षी साखर उतारा १०.५५ टक्के, सिद्धेश्वर १०.१७, श्री विठ्ठल ८.८, भीमा टाकळी ९.०५, श्रीसंत दामाजी ९.२४, चंद्रभागा ८.९५, विठ्ठलराव शिंदे ९.७३, मकाई ७.९७, कुर्मदास ७.६५, लोकनेते ९.८९, सासवड माळी ९.२२, लोकमंगल ॲग्रो ७.८३, विठ्ठल कार्पोरेशन ९.९२, लोकमंगल शुगर ७.७२, सिद्धनाथ शुगर ८.२८, जकराया ५.५३, भैरवनाथ शुगर ८.७९, इंद्रेश्वर शुगर ८.०२, मातोश्री ९.०७, विठ्ठलराव शिंदे (युनिट २) ७०.७८, युटोपियन शुगर ८.३६, भैरवनाथ शुगर ९.६६, भैरवनाथ आलेगाव ९.४, जयहिंद ९.८५, बबनदादा शिंदे शुगर ९.९२, गोकुळ शुगर ८.८, विठ्ठल रिफायनरी ८.७८, औदुंबर ८.३१.
इथेनॉल प्रकल्पाला रोहन परिचारक यांचे मार्गदर्शन
पांडुरंग कारखाना १ लाख लिटर इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प सुरू करणार आहे. त्यामध्ये रोहन परिचारक मार्गदर्शन करणार आहे. रोहन परिचारक बी-टेक इंजिनिअर असून त्यांनी इथेनॉल विषयावर लंडनमध्ये एमबीए मास्टर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ब्राझील व भारतामध्ये इथेनॉल निर्मितीच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला आहे. भविष्यात ‘पांडुरंग’ला टेक्निकल तज्ज्ञ मार्गदर्शक सल्लागार म्हणून रोहन परिचारक पुढे येताना दिसत आहेत.
कोट ::::::::::::::::::
साखरेच्या दारातील चढ-उतारामुळे साखर उद्योग अडचणीत आले आहेत. त्यामुळे कारखान्याने इथेनॉल निर्मितीकडे गेले पाहिजे. भारतात इथेनॉलला चांगला दर मिळत आहे. इथेनॉलमध्ये प्रोजेक्ट केला असून त्याचा नक्कीच फायदा पांडुरंग कारखान्याला होईल. पाडुरंग कारखान्याच्या कुशल व्यवस्थापणामुळे साखर उतारा जिल्ह्यात उच्चांकी आहे.
- रोहन परिचारक
एमबीए (इथेनॉल अभ्यासक)