त्रिशंकु स्थितीमुळे तांबोळे ग्रामपंचायतीत तिडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:22 AM2021-01-20T04:22:48+5:302021-01-20T04:22:48+5:30
मोहोळ : तालुक्यात झालेल्या ६३ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. यापैकी तांबोळे गावात तीन पॅनलच्या तीन-तीन जागा आल्याने ग्रामपंचायतीमध्ये त्रिशंकू ...
मोहोळ : तालुक्यात झालेल्या ६३ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. यापैकी तांबोळे गावात तीन पॅनलच्या तीन-तीन जागा आल्याने ग्रामपंचायतीमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. सौंदणे व हिवरे गावात राष्ट्रवादीच्या गटाने बाजी मारली आहे. कोळेगाव मध्ये मात्र स्थानिक आघाडीने विजय संपादन केला आहे.
तांबोळे ग्रामपंचायतीसाठी एकूण ९ जागा असून विजय कोकाटे यांच्या पॅनलने ९ उमेदवार उभे केले होते. रमेश चौगुले यांच्या पॅनेलमधून ९ उमेदवार उभे होते. रावसाहेब नागणे यांनी वार्ड क्र ३ मधून केवळ तीन उमेदवार उभे केले होते. अशाप्रकारे ९ जागांसाठी ही निवडणूक लागली होती.
परंतू मतदारांनी तिन्ही पुढाऱ्यांना पेचात टाकणाराच निकाल दिला. विजय कोकाटे पॅनला ३ जागा, रमेश चौगुले पॅनलला ३ जागा, रावसाहेब नागणे पॅनलला ३ जागा, विभागून आल्याने या ठिकाणी ग्रामपंचायत त्रिशंकू झाली आहे. आता याचा तिडा मात्र सरपंच पदाचे आरक्षण पडल्यानंतरच सुटणार आहे.
सौंदणे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या नऊ जागेच्या निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भारत सुतकर यांच्या लोकनेते आघाडीने सहा जागा जिंकत सलग तीनदा विजय पटकावला. विरोधामध्ये भाजपाचे शंकर वाघमारे, लोकशक्तीचे संभाजी माने, बब्रुवान माळी यांच्या गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले.
कोळेगाव ग्रामपंचायतीमध्ये लागलेल्या अकरा जागेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्का देत स्थानिक आघाडीने विजय प्राप्त केला आहे. कोळेगावमध्ये राष्ट्रवादीप्रणित संत बाळूमामा पॅनल व स्थानिक आघाडीच्या माध्यमातून बिरुदेव विठ्ठल ग्राम विकास आघाडी यांच्यात लढत झाली. या लढतीत स्थानिक आघाडीचे पॅनल प्रमुख अण्णासाहेब देशमुख, भाऊराव शिंदे यांच्या गटाला सात जागा मिळाल्या. तर कोळेगाव ग्रामपंचायतीवर सत्ता असणाऱ्या संत बाळूमामा पॅनलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.
---
हिवरेत सत्ताधारी गटाचा पाडाव
तालुक्यातील हिवरे येथे लागलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत राष्टवादीच्याच दोन गटात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीप्रणित सिद्धेश्वर ग्राम विकास आघाडीने सत्ताधारी जय भवानी ग्राम विकास पॅनलवर ९ पैकी ९ जागा जिंकत विजय प्राप्त करीत एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले.तालुक्यातील हिवरे येथे लागलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत राष्टवादीच्याच दोन गटात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीप्रणित सिद्धेश्वर ग्राम विकास आघाडीने सत्ताधारी जय भवानी ग्राम विकास पॅनलवर ९ पैकी ९ जागा जिंकत विजय प्राप्त करीत एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले.