महिनाभराच्या सिध्देश्वर यात्रेमुळे सोलापूरला भिक्षुकांची सर्वाधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 05:24 PM2021-02-02T17:24:49+5:302021-02-02T17:28:45+5:30

सर्वच सोयी होतात: जगण्याचा प्रश्न मिटविणारे शहर

Due to the month-long Siddheshwar Yatra, Solapur is the favorite destination of monks | महिनाभराच्या सिध्देश्वर यात्रेमुळे सोलापूरला भिक्षुकांची सर्वाधिक पसंती

महिनाभराच्या सिध्देश्वर यात्रेमुळे सोलापूरला भिक्षुकांची सर्वाधिक पसंती

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर शहर हे राज्यातील महत्त्वाच्या देवस्थानांकडे जाण्यास मध्यवर्ती ठिकाणपार्क चौक, होम मैदान, सिद्धेश्वर मंदिर परिसर व जिल्हा परिषद परिसरात अनेक भिक्षुक राहतात

सोलापूर : राज्यात अनेक मोठी देवस्थाने आहेत. या देवस्थानांमधील यात्रा ही काहीच दिवसांसाठी असते. मात्र, सोलापुरात एक महिना यात्रा चालत असल्याने भिक्षुकांच्या जगण्याचा प्रश्न मिटतो. या कारणाने सोलापूरला भिक्षुक जास्त पसंती देत असल्याचे मत मागील चार वर्षांपासून विदर्भातून सोलापुरात आलेल्या एका भिक्षुकाने व्यक्त केले.

पंढरपूरमध्ये अनेक भाविक येत असल्याने आपला उदरनिर्वाह होईल या अपेक्षेने अकोला येथून ८९ वर्षाचे गृहस्थ हे पंढरपूर येथे कामानिमित्त आले होते. तिथल्या हॉटेलमध्ये चार वर्ष कामही केले. मालकाने हॉटेल विकल्याने कामाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे काही दिवसानंतर ते सोलापुरात आले. श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात ते राहू लागले. येथील गड्डा यात्रा पूर्ण एक महिना चालत असल्याने त्यांच्या खाण्याचा प्रश्न मिटला होता. तसेच हॉटेलमध्ये कामही मिळाले. यात्रा संपली तरीही कुणीतरी येऊन जेवण देतो. खूप दिवस झाले अकोल्याला गेलो नाही. रेल्वे (पॅसेंजर) सुरू झाल्यानंतर जाऊन येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फिट येत असल्याने कामावर घेत नाहीत

कधी पार्क चाैक, कधी होम मैदान, कधी जिल्हा परिषद परिसर येथे एक २० वर्षाचा तरुण फिरत आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर काकाने ३० हजार रुपये मागितले. पैसै जोपर्यंत देत नाही तोपर्यंत घरी येऊ नको, असा दम भरला. त्यामुळे तो तरुण पुण्यातील बहिणीकडे गेला. बहिणीने हाकलून दिले. त्यामुळे हा तरुण सोलापुरात मिळेत ते काम करतो. कुणी खायला दिले तर खातो. तो आधी एका हॉटेलमध्ये काम करत होता. फिट येत असल्याने त्याला कामावरून काढण्यात आले. या आजारामुळे कुणी काम देत नसल्याने उघड्यावर राहत असल्याचे त्याने सांगितले.

प्रातर्विधी टॉयलेटमध्ये तर आंघोळ तलावात

पार्क चौक, होम मैदान, सिद्धेश्वर मंदिर परिसर व जिल्हा परिषद परिसरात अनेक भिक्षुक राहतात. यातील अनेक भिक्षुक हे कॉइन टाकून ई-टॉयलेटचा वापर करतात. स्मार्ट सोलापुरातील स्मार्ट स्वच्छतागृहाचा वापर करत असल्याचे एका ज्येष्ठ भिक्षुकाने सांगितले. आंघोळीसाठी सिद्धेश्वर तलावाचा वापर या भिक्षुकांकडून करण्यात येतो.

सोलापूर शहर हे राज्यातील महत्त्वाच्या देवस्थानांकडे जाण्यास मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे अनेक भिक्षुक सोलापुरात राहणे पसंत करतात. लॉकडाऊननंतर घरातील कर्त्या पुरुषाला स्वत:चे घर चालवता येणे अवघड झाल्याने ज्येष्ठांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक भिक्षा मागताना दिसत आहेत.

- अतिश शिरसट, संभव फाउंडेशन, सोलापूर

 

---------

Web Title: Due to the month-long Siddheshwar Yatra, Solapur is the favorite destination of monks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.