राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे आज आरक्षण गेले उद्या नोकरीही जाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:16 AM2021-07-21T04:16:39+5:302021-07-21T04:16:39+5:30
ते घोंगडी बैठकीच्या निमित्ताने त्यांनी मंगळवेढा (कोष्टी, तेली, वाणी), शनिवार पेठ(वडार,रामोशी,कैकाडी, गोंधळी), तामदर्डी (भोई), मुंढेवाडी (वाणी व ...
ते घोंगडी बैठकीच्या निमित्ताने त्यांनी मंगळवेढा (कोष्टी, तेली, वाणी), शनिवार पेठ(वडार,रामोशी,कैकाडी, गोंधळी), तामदर्डी (भोई), मुंढेवाडी (वाणी व धनगर), बावची (जोशी), निंबोणी (माळी, लोणारी), शिरनांदगी (नाभिक, धनगर), खडकी (दरवेशी, अस्वलवाले, पारधी), लमाणतांडा खडकी,(लमाण, बंजारा), हाजापूर (लोणारी, धनगर), खुपसंगी (मरिआई, गाडीवाले) या समाजाच्या घोंगडी बैठका घेतल्या. त्यावेळी निंबोणी येथे ते बोलत होते. त्यांच्यासमवेत माजी सभापती प्रदीप खांडेकर, माऊली हळणवर, धनाजी गडदे, बापू मेटकरी, बिरुदेव घोगरे, भारत सलगर आदी उपस्थित होते.
आ. पडळकर म्हणाले की, पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारकडून ओबीसीवर सातत्याने अन्याय केला आहे. त्यासाठी ३४६ जातीने आता जागृत व्हायला हवे. राजकारणात ठराविक जातीचे वर्चस्व असल्याने कल्पना असलेल्या समाजाला राजकीय आरक्षण बाजूला ठेवल्यास खुल्या जागेत अल्पसंख्याक समाज टिकाव धरू शकत नाही. गावगाड्यातील सामान्य माणसाला न्याय मिळत नाही तो न्याय मिळवून देण्यासाठी आपण उघडपणे सरकार विरोधी भूमिका घेण्यास तयार आहे, असे सांगितले.