व्याजाची रक्कम न भरल्याने १४व्या वित्त आयोगाची रक्कम मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:23 AM2021-05-18T04:23:36+5:302021-05-18T04:23:36+5:30
माळशिरस तालुक्यातील कोविड सेंटरला आ.रणजीतसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते यांनी भेट देऊन तेथील सोईसुविधांची पाहणी केली. यावेळी ते ...
माळशिरस तालुक्यातील कोविड सेंटरला आ.रणजीतसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते यांनी भेट देऊन तेथील सोईसुविधांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी तालुक्यातील मोरोची, मांडवे, नातेपुते, माळशिरस, निमगांव, पिलीव, तांदुळवाडी, मळोली, वेळापूर व महाळुंग या कोविड केअर सेंटरला भेट दिली. यावेळी डॉक्टरांनी आपल्या अडचणी मांडल्या. कोविड सेंटर उभा करण्यासाठी अनंत अडचणी येतात. ९० ऑक्सिजन लेवल असेल, तर कोविड सेंटरमधून रुग्णाला घरी पाठविले जाते, परंतु रुग्णांना घरघुती ऑक्सिजन घेण्यासाठी भाडेतत्त्वावर मिळत नाही. तो उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी डॉक्टरांनी केल्याचे आ.मोहिते-पाटील म्हणाले.
त्यांच्यासमवेत शंकरराव माने-देशमुख, माजी झेडपी सदस्य सतीशराव माने-देशमुख, अमरसिंह माने-देशमुख, ओंकार माने-देशमुख, डॉ.बी. बी. ओहाळ, डॉ.उदय माने-देशमुख, डॉ.उमेश नाईक, डॉ.अमर माने-देशमुख, डॉ.जयंत चव्हाण, डॉ.रोहित माने-देशमुख, डॉ.अमोल कोळेकर, डॉ.सोमनाथ माने-देशमुख, डॉ.पांडुरंग देवकते, डॉ.समीर दोशी, डॉ.सचिन सावंत, डॉ.महेश कोळेकर आदी सहभागी झाले होते.