पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेमुळे सोलापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 02:19 PM2019-06-27T14:19:58+5:302019-06-27T14:24:02+5:30
अधिकाºयांची सकारात्मक भूमिका; पर्यटक अन् भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार
सोलापूर : तीर्थक्षेत्र अन् पर्यटनाच्या निमित्ताने सोलापुरात येणाºया प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणार असल्याची सकारात्मक भूमिका वाहतूक शाखेच्या अधिकाºयांनी घेतली. पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेमुळे सोलापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
पंढरपूर, अक्कलकोट, श्री सिद्धेश्वर मंदिर, तुळजापूर, गाणगापूर आदी तीर्थक्षेत्र अन् पर्यटनाच्या निमित्ताने सोलापुरात येणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे. बाहेरील प्रवासी हा सोलापूरच्या अर्थकारणाशी जुळलेला महत्त्वाचा घटक आहे. शहराच्या बाहेर असलेल्या नाक्यावर व मुख्य ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून बाहेरील वाहनांची तपासणी होत असते. तपासणीदरम्यान प्रवाशांना कागदपत्रे दाखवावी लागतात. शिवाय अन्य बाबींची चौकशी केली जात होती. चौकशीदरम्यान बºयाच वाहनचालकांना वेगवेगळे अनुभव येत होते. या प्रकारामुळे सोलापूरची प्रतिमा मलिन होत असल्याचे निदर्शनास येत होते. ही बाब लोकमतच्या माध्यमातून मांडण्यात आली होती.
पर्यटकांच्या प्रश्नाला अनुसरून लोकमत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, ग्रामीण पोलीस वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री, पाकणी महामार्ग केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश भंडारे या अधिकाºयांनी साधक-बाधक चर्चा केली. गेल्या अनेक वर्षांपासून महामार्ग व शहराच्या विविध नाक्यांवर असलेल्या तपासणीमध्ये प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले. प्रवाशांनीही नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी केले.
नाराजी निर्माण होणार नाही : रमेश भंडारे
- प्रवासी महामार्गावरून जेव्हा सोलापूरकडे येतात तेव्हा त्यांनी आपली वाहने अतिवेगाने चालवू नये. वाहनांच्या वेगावर नियंत्रण असले पाहिजे. सर्व्हिस रोडव्यतिरिक्त दुसºया मार्गावरून चुकीच्या दिशेने वाहन चालवू नये. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून चांगली वागणूक दिली जाईल. सोलापूरच्या बाबतीत प्रवाशांच्या मनात नाराजी निर्माण होणार नाही याची काळजी घेऊ, असे आश्वासन पाकणी महामार्ग केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश भंडारे यांनी दिले.
पर्यटक सोलापुरात यावेत :कुर्री
- तीर्थक्षेत्रासाठी जात असताना, सोबत कुटुंबीय असतात. प्रवास करताना सर्व कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे. प्रवास करताना नियम असतात, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून त्रास होत असेल तर काळजी घेतली जाईल. सोलापूरला मोठ्या संख्येने पर्यटक यावा, अशीच आमची भूमिका असल्याचे वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांनी व्यक्त केले.
चांगली वागणूक देण्याचा प्रयत्न..
- पर्यटक सोलापुरात येतात, त्यांच्या वाहनांना शहरात पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. शहरातील व्यापारी व अन्य लोकांनी पार्किंगची सोय केली पाहिजे. आलेला प्रवासी हा रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. नाइलाजास्तव काही वाहनांवर कारवाई करावी लागते. शहराच्या बाहेर असलेल्या नाक्यावर कागदपत्रांची तपासणी केली जाते. पोलिसांकडून प्रवाशांना चांगली वागणूक देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही शहर वाहतूकचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी व्यक्त केले.