खड्ड्यांमुळे १५ मिनिटांच्या प्रवासाला लागताेय ५० मिनिटांचा वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:21 AM2021-03-21T04:21:32+5:302021-03-21T04:21:32+5:30

सांगोला-कडलास-जवळा-घेरडी या राज्य मार्गावरील कडलास ते जवळा या ८ कि.मी. रस्त्याच्या दुरुस्ती-देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग सांगोला यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ...

Due to potholes, a journey of 15 minutes takes 50 minutes | खड्ड्यांमुळे १५ मिनिटांच्या प्रवासाला लागताेय ५० मिनिटांचा वेळ

खड्ड्यांमुळे १५ मिनिटांच्या प्रवासाला लागताेय ५० मिनिटांचा वेळ

Next

सांगोला-कडलास-जवळा-घेरडी या राज्य मार्गावरील कडलास ते जवळा या ८ कि.मी. रस्त्याच्या दुरुस्ती-देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग सांगोला यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. तर डांबराचे थर उचकटून गेल्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, याचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. या रस्त्यावरून दररोज जड अवजड ट्रक, कंटनेर,मालट्रक, खाजगी प्रवासी वाहने, एसटी बस, दुचाकी अशी शेकडो वाहने रात्रंदिवस ये- जा करतात. अनेकवेळा छोटे-मोठे अपघात होऊन वाहनांचे नुकसान होत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून किमान वर्षातून एकवेळा तरी नुतनीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

कोट :::::::::::::::::::::::

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून त्या सरकारमधील घटक पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जवळा गावचे रहिवासी आहेत. त्यांचे या रस्त्यावरून सतत येणे-जाणे असते. त्यांना जनतेच्या प्रश्नांची खरी जाण असेल तर या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने सोडविला पाहिजे. भाजप सरकारच्या काळात सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे झाली. परंतु सध्याचे सरकार बिनकामाचे सरकार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.

- श्रीकांत देशमुख

जिल्हाध्यक्ष, भाजप

फोटो ओळ :::::::::::::::::

कडलास ते जवळा ८ कि.मी. जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडल्याचे छायाचित्र.

Web Title: Due to potholes, a journey of 15 minutes takes 50 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.