पुजा-यांच्या भांडणात रुक्मिणीमातेच्या नैवेद्यास उशीर, भाविक अतिशय संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 06:32 AM2017-11-25T06:32:20+5:302017-11-25T06:32:42+5:30
पंढरपूर : दोन पुजा-यांच्या भांडणामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शुक्रवारी रुक्मिणी मातेला चक्क एक तास उपाशी राहावे लागले.
पंढरपूर : दोन पुजा-यांच्या भांडणामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शुक्रवारी रुक्मिणी मातेला चक्क एक तास उपाशी राहावे लागले. या भांडणामुळे रुक्मिणी मातेला एक तास उशिरा महानैवेद्य दाखविण्यात आला़ या प्रकारामुळे भाविक अतिशय संंपातल्याचे दृश्य पंढरपुरात पाहावयास मिळाले.
रोज सकाळी १०़३० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस महानैवेद्य दाखविण्यात येतो़ श्री विठ्ठलास महानैवेद्य दाखवून तो रुक्मिणी मातेच्या गाभाºयात पोहोचल्यानंतर तेथे सुनील गुरव आणि गणेश ताटे यांच्यात वाद सुरू झाला़ त्यामुळेच रुक्मिणी मातेस महानैवेद्य दाखविण्यास एक तास उशीर झाला़ या प्रकारांमुळे भाविक अतिशय चिडले असल्याचे दिसून आले.
>तू तुझे म्हणणे मंदिर समितीकडे का सादर केले?
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीसाठी राज्य सरकारचा कर्मचाºयांच्या नोकरभरतीचा आराखडा मंजूर झाला आहे. याबाबत मंदिर समितीच्या वतीने कर्मचाºयांना आपले म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे़ सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचाºयांना त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे़ पुजारी गणेश ताटे यांनी मंदिरात सात वर्षांची सेवा केली असून, त्यांनी आपले म्हणणे मंदिर समितीकडे सादर केले़ दुसरे पुजारी सुनील गुरव हे २ वर्षांपासून सेवा करीत आहेत. सुनील गुरव यांनी गणेश ताटे यांना ‘तू तुझे म्हणणे मंदिर समितीकडे का सादर केले?’ असा सवाल केला आणि त्यावरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. त्यांचे हे भांडत मंदिरातच एक तास चालले होते.
>बाब गंभीर
रुक्मिणीमातेस एक तास उशिरा महानैवेद्य दाखविण्यात आल्याची बाब गंभीर असून, या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
- बालाजी पुदलवाड,
व्यवस्थापक ,
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर