सुभाष पाटलांमुळे जिल्ह्यात गटबाजी, त्यांना तालुकाध्यक्ष करून मी चूक केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:26 AM2021-08-13T04:26:45+5:302021-08-13T04:26:45+5:30

दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बिपीन करजोळे यांचा कुंभारीच्या चौकात काका साठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ...

Due to Subhash Patil's factionalism in the district, I made a mistake by making him the taluka president | सुभाष पाटलांमुळे जिल्ह्यात गटबाजी, त्यांना तालुकाध्यक्ष करून मी चूक केली

सुभाष पाटलांमुळे जिल्ह्यात गटबाजी, त्यांना तालुकाध्यक्ष करून मी चूक केली

Next

दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बिपीन करजोळे यांचा कुंभारीच्या चौकात काका साठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सोलापूर मनपाचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे होते.

यावेळी बोलताना काका साठे यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटबाजीला स्वतःच तोंड फोडले. ते म्हणाले, जिल्ह्यात चुकीची माणसं पक्षाचे काम करीत आहेत. याची माहिती मी स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिली. त्यांनीच ताबडतोब सुभाष पाटील यांना बाजूला सारले आणि बिपीन करजोळे या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. यावेळी भाजपचे रवी होनराव यांनी भाजपवर टीका करीत राष्ट्रवादीत काम करणार असल्याचे सांगितले.

व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे शिवानंद दरेकर, राष्ट्रवादीचे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, जिल्हा उपाध्यक्ष महेश माने, अशोक करजोळे, महिला अध्यक्ष पूनम पवार, बंदेनवाज कोरबू, ॲड. शरद पाटील, अक्षय बचुटे, जतचे तालुकाध्यक्ष फिरोज मुल्ला, अर्जुन वाघमारे, महादेव इमडे, सिद्धाप्पा कळकिळे, विजयकुमार इमडे, विनायक बिराजदार, महानंदा माळी, सोमनिंग नरोटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

-----

पाण्याच्या प्रश्नांवर मार्ग काढू

ॲड. शरद पाटील यांनी तालुक्यातील उजनीच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या १४ गावांचा प्रश्न मिटविण्यासाठी काका साठे यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यावर काका साठे म्हणाले, शिरापूर उपसा योजनेचा प्रस्ताव मीच दिला. शरद पवारांनी ५० वर्षांनंतर आम्हाला न्याय दिला. तुमच्या तालुक्यासाठीही काम करण्याची माझी तयारी आहे.

-----

आमदार बाहेरचा असल्याने न्याय मिळत नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३४ गावांचे प्रश्न सुटत नाहीत. आमदार एका भागाचा आणि आम्ही दुसऱ्या भागात राहतो. त्यामुळे हा अन्याय सोसावा लागतो. बिपीन करजोळे यांच्या माध्यमातून तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी काका साठे यांनीही लक्ष देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेचे शिवानंद दरेकर यांनी व्यक्त केली.

------

फोटो : ११ साऊथ सोलापूर

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बिपीन करजोळे यांचा सत्कार करताना काका साठे, दिलीप कोल्हे, महेश माने, शिवानंद दरेकर, पूनम पवार, अशोक करजोळे, रवी होनराव, आदी.

-----

Web Title: Due to Subhash Patil's factionalism in the district, I made a mistake by making him the taluka president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.