उन्हामुळे चक्कर येतीय, डोकेही दुखतेय, उपचारासाठी आरोग्य केंद्र झाले सज्ज, उष्माघात नियंत्रण कक्ष सुर
By शीतलकुमार कांबळे | Published: April 27, 2023 01:28 PM2023-04-27T13:28:02+5:302023-04-27T13:28:22+5:30
सोलापूर जिल्ह्यात उष्माघाताने जिल्ह्यातील कोणीही बाधीत होवू नये म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण व उपचार केंद्र सुरू करण्याच्या सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत.
- शीतलकुमार कांबळे
सोलापूर : जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून पुढील काही दिवसात उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात उष्माघाताने जिल्ह्यातील कोणीही बाधीत होवू नये म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण व उपचार केंद्र सुरू करण्याच्या सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत.
उष्माघात नियंत्रण व उपचार केंद्रात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे. उष्माघाताबद्दल आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांकडून आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे उष्माघाताने त्रस्त रूग्णांना आवश्यक त्या उपचाराची सोय केली जाणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयात देखील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे.
नियंत्रण कक्षात सलाइन, औषधे, इंजेक्शन आदींची सोय करण्यात आली आहे. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.