सोलापूर : उकड्यामुळे दार उघडे ठेवून झाेपी गेले ; चोरटे शिरून दीड लाखाचे सोने पळवले
By काशिनाथ वाघमारे | Published: May 2, 2023 05:54 PM2023-05-02T17:54:20+5:302023-05-02T17:55:04+5:30
उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. उकाड्याने हैराण झाल्याने रणदिवे यांचे कुटुंब घर उघडे ठेवून झोपी गेले.
सोलापूर : माढा तालुक्यात सापटने (टें)येथे उघड्या असलेल्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी दागिनेसह रोख रक्कम तीन हजार असा एकूण एक लाख २८ हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना २९ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० नंतर घडली आणि पहाटे ५.४० वा. दरम्यान ही घटना निदर्शनास आली. याबाबत संग्राम बाळासाहेब रणदिवे (वय २३, रा.सापटने टें) यांनी फिर्याद दिली आहे.
उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. उकाड्याने हैराण झाल्याने रणदिवे यांचे कुटुंब घर उघडे ठेवून झोपी गेले. ही संधी साधून चोरटे घरात शिरले. ८० हजार रुपयांचे दोन तोळ्याचे सोन्याचे गंठन, ४० हजारांचे अर्धा तोळ्यांचे दोन अंगठ्या, पाच हजारांचे पैंजणजोड, एक छल्ला, करंडा व बिचवा तसेच तीन हजार रुपये रोख रक्कम असा मौल्यवान ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल शिवाजी भोसले करीत आहेत.