करमाळाकरांना मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव, नगरपरिषदवर काढला मोर्चा
By काशिनाथ वाघमारे | Published: May 22, 2023 06:20 PM2023-05-22T18:20:50+5:302023-05-22T18:21:53+5:30
नगरपरिषदवर मोर्चा काढून हलगीचा कडकडाट
काशिनाथ वाघमारे, सोलापूर: करमाळा शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा मिळाव्यात या मागण्यासाठी करमाळा नगरपरिषदेवर शहरविकास आघाडीच्या वतीने हलगी मोर्चा काढला. मोर्चेकरांनी हलगींचा कडकडाट करायला लावून सा-यांचे लक्ष वेधून घेतले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून हलगी मोर्चास सुरुवात झाली. हा मोर्चा फुलसौदर चौक, जयमहाराष्टू चौक, भवानी पेठ, दत्त पेठ, सुभाष चौक, राशीन पेठ, पुणे रोड मार्गे, नगरपालिका कार्यालय येथे आला.
यावेळी मोर्चा मधील नागरीकांना संबोधत असताना शहरविकास आघाडीचे गटनेते सुनील सावंत विविध प्रश्न मांडत ते सोडवण्याकडे लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन असा ईशारा दिला. करमाळा नगरपरिषदेचे करवसुली अधिकारी बदे यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय शिंदे, उमर मदारी यांनी पाठींबा दिला. यावेळी माजी नगरसेवक संजय सावंत, फारुक जमादार रविंद्र कांबळे, मनोज गोडसे, विजय सुपेकर, गोविंद किरवे, नागेश उबाळे , संभाजी गायकवाड़ गणेश झोळे, शिवाजी विर अशोक ढवळे वाजीद शेख बापू उबाळे, खलिल मुलाणी, मनोज राखुंडे, हाजी फारुक बेग, पांडुरंग सावंत, गणेश अडसुळ, अशोक मोरे, विकास उबाळे उपस्थित होते.