वादळी वाऱ्यामुळे साेलापुरात झाडे पडली, अनेक भागात साडेचार तास वीज पुरवठा ठप्प
By राकेश कदम | Published: May 26, 2024 09:23 PM2024-05-26T21:23:19+5:302024-05-26T21:23:38+5:30
नागरिकांचे माेठे नुकसान : आपतकालीन यंत्रणाही राबली
राकेश कदम. साेलापूर : शहरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अक्कलकाेट राेड, हाेटगी राेड, जुळे साेलापूर, हत्तुरेवस्ती, शंकरनगर, नई जिंदगी भागात झाडे उन्मळून रस्त्यावर, विजेच्या तारांवर काेसळली. या भागातील वीजपुरवठा सायंकाळी साडेपाच ते नऊ वाजेपर्यंत बंद हाेता. महापालिकेचे आपतकालीन पथक, वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना तारांवर काेसळलेली झाडे हटविण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले.
सायंकाळी पाचच्या सुमाराला ढग दाटून आले. वारे वाहू लागले. यादरम्यान महापालिकेच्या आपतकालीन कक्षात विविध भागांत नुकसान झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. नगर अभियंता सारिका आकुलवार, उपअभियंता युसूफ मुजावर यांनी नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना या भागात जाऊन रस्त्यावर पडलेली झाडे, साहित्य हटविण्याच्या सूचना केल्या.
अक्कलकाेट राेड भागातील राजूनगरमध्ये झाड काेसळले. या भागातील रहिवाशी, मनपाच्या आपतकालीन पथकाने सायंकाळी सहा वाजता झाड बाजूला काढले. वीजपुरवठा सुरू व्हायला बराच वेळ लागला. जुळे साेलापुरातील बाॅम्बे पार्क, गंगाधरनगर भागात वाऱ्यामुळे झाडे काेसळली. विमानतळाच्या समाेर हत्तुरेवस्ती भागातील झाडे रस्त्यावर काेसळली. विजेच्या तारा तुटल्या, खांबशंकरनगर भागातील बिराेबा मंदिराजवळचे ५० वर्षांपूर्वीचे झाडही तारांवर काेसळले. मजरेवाडी ते सिद्धेश्वर कारखाना परिसरातील वीजपुरवठा साडेचार तास बंद हाेता, असे माजी नगरसेवक सुभाष शेजवाल आणि वैभव हत्तुरे यांनी सांगितले.
महापाैर बंगलाच्या मागील झाडही विजेच्या तारांवर काेसळले. हे झाड हटविण्यासाठी पथकाला बरेच परिश्रम घ्यावे लागले.