अपघातामुळे रस्त्यात पडला काट्यांचा सडा; साळींदरचा मृत्यू, बंकलगी येथील घटना

By शीतलकुमार कांबळे | Published: June 5, 2024 05:10 PM2024-06-05T17:10:16+5:302024-06-05T17:10:21+5:30

वनविभागाने सालिंदरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले.

Due to the accident, the forks fell on the road; Death of Salinder, incident at Bnkalgi | अपघातामुळे रस्त्यात पडला काट्यांचा सडा; साळींदरचा मृत्यू, बंकलगी येथील घटना

अपघातामुळे रस्त्यात पडला काट्यांचा सडा; साळींदरचा मृत्यू, बंकलगी येथील घटना

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथे चार चाकी वाहनाने साळींदर या प्राण्याला चिरडले. त्यामुळे जवळगी रस्त्यावर रक्त आणि काट्याचा सडा पडला होता.प्राणीमित्र सामाजिक संस्थेचे मल्लिकार्जुन यांनी याची माहिती वन विभागाला दिली. वनविभागाने सालिंदरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले.

सध्या साळींदर या प्राण्याचा मिलनाचा काळ सुरू आहे. त्यामुळे ते संध्याकाळपासून सकाळपर्यंत बाहेर दिसतात. याच काळात दोन साळिंदर फिरत असताना बंकलगी-जवळगी रस्त्यावर वाहनाने एका साळींदरला चिरडले. या अपघातात एका साळींदरचा जागेवर मृत्यू झाला तर दुसरे जखमी साळींदर पळून गेले.

 मल्लिकार्जुन धुळखेड यांनी ही घटना पाहिली त्यांनी त्वरित विभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी साळींदरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. साळींदर हा प्राणी कंदमुळे शेंगा आधी जमिनीतील पदार्थ शोधून खातात. हा प्राणी निशाचर असल्यामुळे रात्रीच बाहेर पडतो. काही वेळा सकाळी किंवा दुपारी दिसतो अशी माहिती मल्लिकार्जुन धुळखेडे  यांनी दिली.

Web Title: Due to the accident, the forks fell on the road; Death of Salinder, incident at Bnkalgi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.