MPSC च्या परीक्षेमुळे ९ ऑक्टोबरपासून होणार सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव

By बाळकृष्ण दोड्डी | Published: September 22, 2022 05:43 PM2022-09-22T17:43:48+5:302022-09-22T17:44:36+5:30

९ ते १२ ऑक्टोबर मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात होणार युवा महोत्सव

Due to the MPSC exam, Solapur University Youth Festival will be held from October 9 | MPSC च्या परीक्षेमुळे ९ ऑक्टोबरपासून होणार सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव

MPSC च्या परीक्षेमुळे ९ ऑक्टोबरपासून होणार सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव

Next

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या तारखेत एमपीएससीच्या परीक्षेमुळे बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता ९ ते १२ ऑक्टोबर या दरम्यान मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात युवा महोत्सव होणार असल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली.

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून याआधी ७ ते १० ऑक्टोबर या कालावधीत युवा महोत्सवाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र ८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा होणार असल्यामुळे दोन दिवस युवा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. त्यानुसार आता ९ ते १२ ऑक्टोबर यादरम्यान मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात युवा महोत्सव होणार आहे.

Web Title: Due to the MPSC exam, Solapur University Youth Festival will be held from October 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.