अकृषी वीजग्राहकांची थकबाकी ११४१ कोटींच्यावर; सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

By Appasaheb.patil | Published: March 29, 2023 07:08 PM2023-03-29T19:08:50+5:302023-03-29T19:09:09+5:30

सर्व ग्राहकांनी त्यांचेकडील चालूसह व थकीत वीजबिलाचा भरणा करुन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणतर्फे केले आहे.

Dues of non-agricultural consumers over 1141 crores; Electricity bill payment center will be open even on holidays | अकृषी वीजग्राहकांची थकबाकी ११४१ कोटींच्यावर; सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

अकृषी वीजग्राहकांची थकबाकी ११४१ कोटींच्यावर; सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

googlenewsNext

सोलापूर -  चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना ज्यांनी अद्याप आपले वीजबिल भरले नाही अशा ग्राहकांसाठी पुढील दोन्ही दिवस वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. सर्व ग्राहकांनी त्यांचेकडील चालूसह व थकीत वीजबिलाचा भरणा करुन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणतर्फे केले आहे.

बारामती परिंमडलात आज रोजी अकृषी वीजग्राहकांची थकबाकी ११४१ कोटींच्यावर आहे. ही थकबाकी कमी करण्यासाठी वीज कर्मचारी सातत्याने प्रयत्न करतात. घरोघरी पोहोचून वारंवार सोशल मिडीयाद्वारे आवाहन केले जाते. ग्राहकांना वीजबिलाचा भरणा सुलभ व्हावे म्हणून महावितरणने वीजबिलावर ‘क्यूआर कोड’ छापला आहे. त्याला स्कॅन करुन सहजपणे वीजबिल भरता येते. पैसे खर्चून रांगेत थांबण्याची गरज नाही. मात्र ज्यांना ऑनलाईन शक्य नाही असे ग्राहक आजही महावितरणच्या नजीकच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रावर वीजबिल भरतात. त्यासाठी सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत.

गुरुवारी (दि. ३०) श्रीराम नवमीची सुट्टी असली तरी वीजबिल भरणा केंद्रे नियमित वेळेत सुरु राहणार आहेत. घरबसल्या चालू व थकीत बिलांचा भरणा करण्यासाठी संकेतस्थळ, महावितरण मोबाईल अॅप व विविध यूपीआय ॲप उपलब्ध आहेत.

Web Title: Dues of non-agricultural consumers over 1141 crores; Electricity bill payment center will be open even on holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.