सोलापूरच्या अणू आवर्त सारणीच्या प्रतिकृतीचा मॉरिशसमध्ये डंका
By Appasaheb.patil | Published: January 9, 2020 10:38 AM2020-01-09T10:38:10+5:302020-01-09T10:44:55+5:30
सोलापुरातील महापालिका शाळेतील शिक्षकाची किमया; देशात मिळविला दुसरा क्रमांक
सोलापूर : अणूचा आकार, त्रिज्या, त्याचे वस्तुमान अन् त्याच्या आकारमानात होणारा बदल यासंदर्भातील अमूर्त संकल्पना समजावून सांगण्यासाठी एकच सोडियमचा अणू तयार करून उपयोग नाही, त्यासाठी पूर्ण आवर्त सारणी तयार करण्याची गरज आहे, असे ठासून सांगत सोलापूर महापालिका शाळा क्रमांक २ चे विज्ञान शिक्षक युध्दवीर महिंद्रकर यांनी सादर केलेल्या अणूच्या आवर्त सारणीला (पिरॉडिक टेबल) मॉरिशस येथे आयोजित केलेल्या वैज्ञानिकांच्या आंरराराष्टÑीय परिषदेत दुसरा क्रमांक मिळाला आहे.
आॅस्ट्रेलिया आणि मॉरिशस इस्टिट्यूट आॅफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्टीन विद्यापीठात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महिंद्रकर यांनी भाग घेतला होता.
अॅल्युमिनियम, सिलिकॉन यांसारख्या गुणमर्धाच्या मूलद्रव्य सापडतीलच असा अंदाज रशियन रसायनशास्त्रज्ञ डर्मिट मेंडेलीव्हने पूर्ण आत्मविश्वासाने व्यक्त केला होता़ तो अंदाज १८७२ साली खरा ठरला़ मेंडेलीव्हने १८६९ साली रासायनिक मूलद्रव्याचे वर्गीकरण आवर्त सारणीच्या स्वरूपात केले़ या घटनेला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत.
म्हणून २०१९ हे वर्ष जगभर आवर्त सारणीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे होत आहे़ त्यानिमित्त मॉरिशस येथे आंतरराष्ट्रीय परिषद भरविण्यात आली होती.
या परिषदेत अमेरिका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड यांसह अन्य १०२ देशांतील वैज्ञानिकांनी सहभाग नोंदविला होता़ यात ११८ मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीच्या प्रतिकृती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरल्या. त्या सारणीच्या अणूंच्या प्रतिकृती आणि ‘पीपीटी’च्या (पॉवर पॉईन्ट प्रेझंटेशन) साहाय्याने महिंद्रकर यांनी भारतीय त्रिमितीय आवर्त सारणी या विषयावरील संशोधनावर आपले मत मांडले़
काय होती महिंद्रकरांची प्रतिकृती...
- याबाबत दयानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य स्व़ नागेश धायगुडे, प्रा़ वैशाली धायगुडे यांच्याशी चर्चा करून क्रांतिवीर महिंद्रकर व कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने ही सारणी पूर्ण केल्याचे युद्धवीर महिंद्रकर सांगतात़ यासाठी मला प्रा़ डॉ़ सुधाकर आगरकर, जयंत जोशी, अ़ पां़ देशपांडे, हेमंत लागवणकर, ज्येष्ठराज जोशी, प्रा़ डॉ़ राजशेखर हिप्परगी, प्रा़ व्यंकटेश गंभीर, रवी कटारे, योगीन गुर्जर, मुख्याध्यापक मोटे, छाया महिंद्रकर यांची मदत झाल्याचेही महिंद्रकर यांनी सांगितले़