कार्तिकी यात्रेच्या बंदोबस्तावेळी PSI च्या बंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीमुळे दुसरा PSI जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 03:40 PM2017-10-25T15:40:45+5:302017-10-25T15:43:32+5:30

पीएसआय राजेंद्र कदम यांच्या मांडीतून गोळी आरपार गेली असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

During the closure of the Kartika Yatra, the PSI gun shot down the pill and accidentally broke the second PSI! | कार्तिकी यात्रेच्या बंदोबस्तावेळी PSI च्या बंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीमुळे दुसरा PSI जखमी

कार्तिकी यात्रेच्या बंदोबस्तावेळी PSI च्या बंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीमुळे दुसरा PSI जखमी

googlenewsNext

पंढरपूर : पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली. समोरच असलेल्या दुसऱ्या पोलिस उपनिरीक्षकाच्या पायात ती गोळी घुसली. त्यामुळे पोलिस इपनिरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. 
पंढरपुरात सध्या कार्तिकी यात्रेची धामधूम सुरु आहे. काही दिवसांवर कार्तिकी एकादशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे पंढरपुरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तावेळीच ही घटना घडली.

पीएसआय बाळासाहेब जाधाव यांच्या रिव्हालवर मधून चुकून सुटलेली गोळी समोर असलेल्या पीएसआय राजेंद्र कदम यांना चाटून गेली. कदम यांच्या मांडीतून गोळी आरपार गेली असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरातील पांडुरंगाचे २४ तास दर्शन सुरू

 ३१ आॅक्टोबर रोजी कार्तिकी यात्रा सोहळा असल्याने सध्या पंढरीत भाविकांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे रविवारपासून आॅनलाईन दर्शन बंद करून २४ तास दर्शन सुरू ठेवले आहे़.  रविवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक रवींद्र वाळूजकर, नित्योपचार प्रमुख हणमंत ताटे यांच्या हस्ते श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेचे नित्योपचार व पूजा करण्यात आली़ त्यानंतर देवास लोढ देऊन पलंगही काढण्यात आला आहे़ आता २५ आॅक्टोबरपासून व्हीआयपी दर्शन पासही बंद करण्यात येणार आहे़​​​​​. दर्शन रांग कासारघाटाच्या पुढे गेली असून ती दिवसेन्दिवस वाढतच आहे़ त्यामुळेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने २२ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत आॅनलाईन दर्शन बंद करून २४ तास दर्शन सुरू ठेवले आहे़. त्यामुळे आता भाविकांना दर्शन घेणे सोयीचे झाले आहे़ 

 

 

Web Title: During the closure of the Kartika Yatra, the PSI gun shot down the pill and accidentally broke the second PSI!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.