विकासकामांच्या पाहणी दौऱ्यात सभापतींनी केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:36+5:302021-06-24T04:16:36+5:30
यावेळी पाचेगावच्या सरपंच इंदाबाई करचे, उपसरपंच प्रा. महेंद्र दौंड, पप्पू करचे यांनी पाचेगाव बु. ते किडेबिसरी व पाचेगाव बु. ...
यावेळी पाचेगावच्या सरपंच इंदाबाई करचे, उपसरपंच प्रा. महेंद्र दौंड, पप्पू करचे यांनी पाचेगाव बु. ते किडेबिसरी व पाचेगाव बु. ते बाणूरगड रस्ता डांबरीकरण करणे, सटवाई मंदिर रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, स्मशानभूमी संरक्षण भिंत, सुशोभीकरण करणे, पाचेगाव येथील म्हसोबा मंदिर सुशोभीकरण करणे, पाण्याच्या टाकीची उंची व क्षमता वाढविणे याबाबतचे निवेदन दिले. तसेच अंगणवाडी सेविकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करून मसोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. ग्रामपंचायतीतर्फे नव्याने खोदलेल्या पाणीपुरवठा विहिरीचीही पाहणी केली.
यावेळी पं. स. सदस्य सीताराम सरगर, पाणीपुरवठा शाखा अभियंता माळी, नकाते, पशुवैद्यकीय अधिकारी चंदनशिवे, कृषी सहायक गवळी, ग्रामसेवक ए. एस. इंगोले, मुख्याध्यापक डी. बी. घोडके, माजी उपसरपंच माणिक ढेमरे, रघुनाथ गायकवाड, माजी सैनिक मोहन घोडके, बी. आर. बिले, प्रमोद बनसोडे, देवाप्पा काबुगडे, लिपिक शशिकांत मंडले, संजय खरात, अशोक दौंड, अशोक कांबळे, आदी उपस्थित होते.