अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त विठ्ठल मंदिरात दूर्वांची आरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:40 AM2021-03-04T04:40:52+5:302021-03-04T04:40:52+5:30

पंढरपूर : अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात, तसेच मंदिरात दूर्वांची मनमोहक आरास करण्यात आली. प्रत्येक ...

Durvani decoration in Vitthal temple on the occasion of Angarki Sankasht Chaturthi | अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त विठ्ठल मंदिरात दूर्वांची आरास

अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त विठ्ठल मंदिरात दूर्वांची आरास

Next

पंढरपूर : अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात, तसेच मंदिरात दूर्वांची मनमोहक आरास करण्यात आली.

प्रत्येक सण, उत्सव, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताकदिनी आकर्षक फुलांची सजावट करण्याचे काम श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात दूर्वांची सजावट करण्यात आली.

वडगाव- धायरी (पुणे) येथील श्रीमंत मोरया ग्रुपच्या वतीने उद्योजक सचिन चव्हाण, संदीप पोकळे, प्रकाश पोकळे यांनी मंदिरातील सजावटीचा खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली. याची दाखल घेत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी मोरया ग्रुपला सेवा करण्याची संधी दिली. अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त विठ्ठल मंदिरात दूर्वांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला. विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात या सजावटीमुळे परिसर हिरवाईने नटल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना अधिकच प्रसन्न वाटत होते.

Web Title: Durvani decoration in Vitthal temple on the occasion of Angarki Sankasht Chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.