शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी प्रकल्प ठरेल फायदेशीर- चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:21 AM2021-09-25T04:21:54+5:302021-09-25T04:21:54+5:30

दहीवली-निमगाव येथील विठ्ठल गंगा शेतकरी कंपनीच्या कार्य स्थळावर शेतकरी व कर्मचारी यांच्यासाठी ई पीक पाहणी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत ...

E-crop survey project will be beneficial for farmers- Chavan | शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी प्रकल्प ठरेल फायदेशीर- चव्हाण

शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी प्रकल्प ठरेल फायदेशीर- चव्हाण

Next

दहीवली-निमगाव येथील विठ्ठल गंगा शेतकरी कंपनीच्या कार्य स्थळावर शेतकरी व कर्मचारी यांच्यासाठी ई पीक पाहणी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होेते. याप्रसंगी विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसरचे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी सांगितले की राज्याच्या व केंद्राच्या योजना तयार होणे त्याचे मूल्यमापन होण्यासाठी हा महत्त्वाचा घटक आहे. पीक पेरणी आणि पाहण्याची तंतोतंत आणि वस्तुस्थिती दर्शक माहिती जमीन पातळीवरून अवगत होणे गरजेचे आहे. महसूल प्रशासनाच्या या प्रकल्पात जास्तीत जास्त सहकार्य करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

या प्रशिक्षणासाठी निमगावचे माजी सरपंच रवींद्र शिंदे, माजी सरपंच जागीरदार, सुनील खापरे, सचिन शिंदे,येळे,चट्टे, खंडू नावडकर, डॉ. अमोल माने, यशवंत भोसले, महेश डोके,राहुल वरपे, अक्षय गुडेकर ,समाधान लोंढे, शरद घाडगे, संदीप मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

...............

फोटो : २३कुर्डूवाडी

230921\3558img-20210922-wa0241.jpg

निमगाव येथील विठ्ठल गंगा शेतकरी कंपनीच्या कार्य स्थळावर शेतकरी व कर्मचारी यांच्यासाठी ई पीक पाहणी प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्त माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण आल्यानंतर सत्कार करताना कंपनीचे चेअरमन धनराज शिंदे व इतर मान्यवर

Web Title: E-crop survey project will be beneficial for farmers- Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.