प्रत्येक विद्यार्थ्यांला शिकण्याची प्रक्रिया आनंददायी वाटावी, सीईओ राजेंद्र भारुड यांचे मत, ‘प्रिसिजन’ची शिक्षकांसाठी ई-लर्निंग कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:07 PM2018-01-09T13:07:24+5:302018-01-09T13:09:56+5:30

शिवछत्रपती रंगभवन सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यशाळेस शिक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रिसिजन समूहातर्फे ई लर्निंग किट देण्यात आलेल्या १०० शाळांमधील ६०० पेक्षाही अधिक शिक्षकांनी या एकदिवसीय कार्यशाळेत सहभाग नोंदवला

E-learning workshop for 'Precision' teachers, says Rajendra Bharud, CEO, CEO | प्रत्येक विद्यार्थ्यांला शिकण्याची प्रक्रिया आनंददायी वाटावी, सीईओ राजेंद्र भारुड यांचे मत, ‘प्रिसिजन’ची शिक्षकांसाठी ई-लर्निंग कार्यशाळा

प्रत्येक विद्यार्थ्यांला शिकण्याची प्रक्रिया आनंददायी वाटावी, सीईओ राजेंद्र भारुड यांचे मत, ‘प्रिसिजन’ची शिक्षकांसाठी ई-लर्निंग कार्यशाळा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘व्हीजन २०२०’ अंतर्गत येत्या तीन वर्षांमध्ये या शाळांवर विशेष लक्ष देऊन त्यांना मॉडेल शाळा बनविण्याचा प्रयत्न : डॉ. सुहासिनी शहाठाणे जिल्ह्यातील पाष्टेपाडा येथील ख्यातनाम प्रयोगशील शिक्षक संदीप गुंड यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केलेया कार्यशाळेमध्ये इनोव्हेटिव्ह अ‍ॅप्स्चा वापर गुणवत्ता वाढीसाठी कसा करावा याबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९  : प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याची प्रक्रिया आनंददायी वाटावी, यासाठीचे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज येथे केले. प्रिसिजन समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या ई - लर्निंग कार्यशाळेत ते बोलत होते.
येथील शिवछत्रपती रंगभवन सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यशाळेस शिक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रिसिजन समूहातर्फे ई लर्निंग किट देण्यात आलेल्या १०० शाळांमधील ६०० पेक्षाही अधिक शिक्षकांनी या एकदिवसीय कार्यशाळेत सहभाग नोंदवला. माढा, मोहोळ, अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर, बीड, कोल्हापूर येथील शाळांमधील शिक्षक उपस्थित होते. स्मार्ट बोर्ड हाताळणारे तंत्रज्ञ आणि हाती लॅपटॉप घेऊन बसलेले शिक्षक या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या भूमिकेत होते.
यावेळी  उपशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर सगरे, महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुधा साळुंखे, प्रिसिजन कॅमशाफ्टस्चे चेअरमन यतिन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, सर फाउंडेशनचे सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ  यांची प्रमुख उपस्थिती होती.
 भारुड म्हणाले, शिक्षक हा ज्ञान आणि विद्यार्थी यांच्यामधील माध्यम आहे. विद्यार्थ्यांची नैसर्गिक वाढ होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याची प्रक्रिया आनंददायी वाटायला हवी. साळुंखे        म्हणाल्या, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणपद्धती रुजवण्यासाठी शिक्षकांनी तंत्रस्नेही व्हावे. त्यासाठी प्रिसिजनने दिलेल्या ई लर्निंग किटचा पुरेपूर उपयोग करावा, असेही आवाहन त्यांनी केले.
डॉ. शहा यांनी प्रिसिजन ई लर्निंग प्रोजेक्टचा आढावा घेतला. ‘व्हीजन २०२०’ अंतर्गत येत्या तीन वर्षांमध्ये या शाळांवर विशेष लक्ष देऊन त्यांना मॉडेल शाळा बनविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील पाष्टेपाडा येथील ख्यातनाम प्रयोगशील शिक्षक संदीप गुंड यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच ई लर्निंग किटची वैशिष्ट्ये, त्याचा वापर करण्याची पद्धत, डिजिटल अभ्यासक्रम याबाबत तंत्रज्ञाच्या टीमने प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी आदित्य गाडगीळ, मंजिरी जोरापूरकर, दीप्ती राजे, अश्विन शिंदे, डांगे तसेच सर फाउंडेशनच्या हेमा शिंदे, राजकिरण चव्हाण, राहुल सुरवसे, नवनाथ शिंदे, परवेज शेख, प्रिया सुरवसे, शरणाप्पा फुलारी या सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
----------------
गुणवत्ता वाढीचे उपाय...
- या कार्यशाळेमध्ये इनोव्हेटिव्ह अ‍ॅप्स्चा वापर गुणवत्ता वाढीसाठी कसा करावा याबद्दल त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. नांदुरी (ता.औसा, जि.लातूर) येथील केंद्रप्रमुख कमलाकर सावंत यांनी गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक इतर उपाय सुचविले. बाळासाहेब वाघ यांनी नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांची माहिती दिली. पारगाव जोगेश्वरी (जि. बीड) येथील सोमनाथ वाळके यांनीही नावीन्यपूर्ण संकल्पना मांडल्या. 

Web Title: E-learning workshop for 'Precision' teachers, says Rajendra Bharud, CEO, CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.