अतिवृष्टीने मयत झालेल्या प्रत्येक कुटुंबियांच्या वारसाला मिळणार चार लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 01:18 PM2020-10-19T13:18:19+5:302020-10-19T13:18:24+5:30

मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार मदतीच्या धनादेशाचे वाटप; आज मुख्यमंत्री सोलापूर दौºयावर

Each family who dies due to excessive rainfall will get Rs 4 lakh assistance | अतिवृष्टीने मयत झालेल्या प्रत्येक कुटुंबियांच्या वारसाला मिळणार चार लाखाची मदत

अतिवृष्टीने मयत झालेल्या प्रत्येक कुटुंबियांच्या वारसाला मिळणार चार लाखाची मदत

Next

सोलापूर : अतिवृष्टी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात झालेल्या 16 जणांचा मृत्यू झाला़ या मयत झालेल्या 16 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात येणार आहे. या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज सोलापुरातील एका कार्यक्रमा दरम्यान देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मागील आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा आदी तालुक्यात पावसाने चांगलेच झोडपले़ या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली़ अनेकांच्या शेतात व घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले़ याच कालावधीत अतिवृष्टीने जिल्ह्यात 16 जणांचा बळी गेला.

 या अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज सोलापूर जिल्हा दौºयावर आहेत. सकाळी सुरू झालेल्या दौºयात मुख्यमंत्री अक्कलकोट तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या़ सोलापुरातील नियोजन भवनात होणाºया एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री अतिवृष्टीने मयत झालेल्या कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले़ 

Web Title: Each family who dies due to excessive rainfall will get Rs 4 lakh assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.