यापूर्वी लोकप्रतिनिधींनी ३५ गावातील पाण्याचे राजकारण केले : पडळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:27+5:302021-04-06T04:21:27+5:30

मंगळवेढा : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघामध्ये यापूवीर् आलेल्या लोकप्रतिनिधींनी ३५ गावच्या पाण्याचे राजकरण करुन निवडून आले. यापूर्वी त्यांच्यासोबत जाऊन पाहिले मात्र ...

Earlier, people's representatives politicized water in 35 villages: Padalkar | यापूर्वी लोकप्रतिनिधींनी ३५ गावातील पाण्याचे राजकारण केले : पडळकर

यापूर्वी लोकप्रतिनिधींनी ३५ गावातील पाण्याचे राजकारण केले : पडळकर

Next

मंगळवेढा : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघामध्ये यापूवीर् आलेल्या लोकप्रतिनिधींनी ३५ गावच्या पाण्याचे राजकरण करुन निवडून आले. यापूर्वी त्यांच्यासोबत जाऊन पाहिले मात्र अद्याप प्रश्न सुटला नसल्याचे प्रतिपादन विधानपरिषद आ.गोपीचंद पडळकर यांनी केले.

ते समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी नंदेश्वर गावात बोलत होते.

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख ,उपाध्यक्ष सुभाष मस्के,बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते माऊली हलणवर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,सिध्देश्वर कोकरे, माजी नगरसेवक चंद्रकांत पडवळे,पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर, धनगर समाजाचे नेते बापूसाहेब मेटकरी,धनाजी गडदे, अंकुश गरंडे,भारत गरंडे,आकाश डांगे, दत्ता साबणे, चंद्रकांत गरंडे आदी उपस्थित होते.

येथील मजूर ऊसतोडणीसाठी या सरकारला हवा आहे म्हणून ३५ गावातील शेतकऱ्यांना हे सरकार पाणी देत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Earlier, people's representatives politicized water in 35 villages: Padalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.