अल्पवयीन मुलीचे पहाटे अपहरण; मजूर बापाची पोलिस ठाण्यात धाव
By विलास जळकोटकर | Published: March 20, 2024 07:49 PM2024-03-20T19:49:05+5:302024-03-20T19:49:16+5:30
शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिगारी काम करुन उपजीविका करणारे कुटुंब मंगळवारी रात्री दैनंदिन काम आटोपून झोपी गेले होते.
सोलापूर : जेवण आटोपून घरी कुटुंबासमवेत झोपी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे कोणीतरी आमिष दाखवून अपहरण केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन केली आहे. हा प्रकार बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिगारी काम करुन उपजीविका करणारे कुटुंब मंगळवारी रात्री दैनंदिन काम आटोपून झोपी गेले होते. पहाटे फिर्यादी पिता जागी झाल्यानंतर त्यांना १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी दिसली नाही. तिचा नातलगांसह सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. अखेर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. सदर मुलीला मराठी, हिंदी दोन्ही भाषा येतात. तिला कोणीतरी आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाघमारे, सपोनि सोळुंखे यांनी भेट देऊन पुढील तपासाच्या सूचना दिल्या. हवालदार कटके पुढील तपास करीत आहेत.