उजव्या डाव्या कालव्याच्या संपादित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:25 AM2021-09-21T04:25:04+5:302021-09-21T04:25:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : जिल्ह्यात पंढरपूर, मोहोळ तालुक्याबरोबर इतर प्रत्येक तालुक्यात ज्या-ज्या गावातून उजनी धरणाचा उजवा डावा कालवा ...

Edit right left canal | उजव्या डाव्या कालव्याच्या संपादित

उजव्या डाव्या कालव्याच्या संपादित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : जिल्ह्यात पंढरपूर, मोहोळ तालुक्याबरोबर इतर प्रत्येक तालुक्यात ज्या-ज्या गावातून उजनी धरणाचा उजवा डावा कालवा गेला आहे त्या काळामध्ये ४० वर्षांपूर्वी काही शेतकऱ्यांनी मोबदला घेतला नाही. मिळाला तो तोकडा मोबदला मिळाला. त्यांना सुधारित पद्धतीने पाचपट नुकसान भरपाई मिळावी. समृद्धी महा मार्गामध्ये रस्त्यात गेलेल्या शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीचा मोबदला एका गुंठ्याला चार ते पाच लाख रुपये शासनाने दिला. मग उजव्या-डाव्या कालव्यामध्ये मध्ये गेलेला जमिनीच्या संपादित जमिनीचा मोबदला या शेतकऱ्यांना तोकडा अल्प रकमेचा कशासाठी, यांनाही सुधारित वाढीव मोबदला द्यावा अशीही मागणी शेतकरी संघटनेने पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात लावून धरली होती. पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन झाले होते. प्रांत अधिकारी व जलसंपदा अधिकारी यांनी आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावल्याचे जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Edit right left canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.