भूलथापा देणाऱ्यांना सुशिक्षीत मतदारांनी त्यांची जागा दाखविली : लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:20 AM2021-02-07T04:20:58+5:302021-02-07T04:20:58+5:30

पुणे पदवीधर मतदार संघातून विक्रमी मतांनी विजय झाल्यानंतर प्रथमच आ. अरुणअण्णा लाड यांनी मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी सांगोला दौरा ...

Educated voters show their place to misleaders: Lad | भूलथापा देणाऱ्यांना सुशिक्षीत मतदारांनी त्यांची जागा दाखविली : लाड

भूलथापा देणाऱ्यांना सुशिक्षीत मतदारांनी त्यांची जागा दाखविली : लाड

Next

पुणे पदवीधर मतदार संघातून विक्रमी मतांनी विजय झाल्यानंतर प्रथमच आ. अरुणअण्णा लाड यांनी मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी सांगोला दौरा केला. यावेळी जिल्ह्याचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडणारे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. दीपक साळुंखे-पाटील यांचे आभार मानले.

यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे लतिफ तांबोळी, माजी अध्यक्षा जयमला गायकवाड, तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शहराध्यक्ष तानाजी पाटील, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शुभांगी पाटील, महादेव गायकवाड, डॉ. पीयूष साळुंखे-पाटील, कृषी सभापती अनिल मोटे, योगेश खटकाळे, विजय पवार, विनायक मिसाळ, दीपक शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष तोहिद मुल्ला, नगरसेवक सोमनाथ लोखंडे, जुबेर मुजावर, अनिल खडतरे, आनंद घोंगडे, संपतराव पाटील, मनोज उकळे, विनोद रणदिवे, शिवाजी कोळेकर, अमोल सावंत, अकिब पटेल, तुषार इंगळे, महेश गुरव, सचिन पाटणे, भारत साळुंखे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संगोला दौऱ्यात आ. अरुणअण्णा लाड यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आ. गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. यावेळी माजी आ. देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक रफिक तांबोळी, सुरेश माळी, ॲड. भारत बनकर, राजू मगर, विजय पवार आदी उपस्थित होते.

फोटो ओळ ::::::::::::::::::::::::::

पुणे पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आ. अण्णा लाड यांचे सांगोला राष्ट्रवादी भवन येथे स्वागत करून सत्कार करण्यात आला.

Web Title: Educated voters show their place to misleaders: Lad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.