शिक्षणाधिकारी किरण लोहार अखेर निलंबित
By शीतलकुमार कांबळे | Published: November 7, 2022 05:46 PM2022-11-07T17:46:58+5:302022-11-07T17:47:44+5:30
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना निलंबित करण्यात आले आहे.
शीतलकुमार कांबळे
सोलापूर: वाढीव तुकडीला मान्यता देण्यासाठी 25 हजार रूपयांची लाच घेताना प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. या प्रकरणी किरण लोहार यांना निलंबित करण्यात आले आहे.
3 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाकडून अहवाल प्राप्त होताच तातडीने जिल्हा परिषद प्रशासनाने अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई, आयुक्त शिक्षण विभाग पुणे व संचालक शिक्षण विभाग पुणे या कार्यालयांना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर पुढील प्रशासकीय कारवाईसाठी अहवाल पाठवला होता.
त्यानुसार राज्य शासनाकडून 7 नोव्हेंबर रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन आदेशानुसार किरण लोहार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) (गट-अ), जि.प.सोलापूर यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेश होईपर्यंत ते निलंबित राहतील. त्याचप्रमाणे निलंबन कालावधीत लोहार यांचे मुख्यालय सोलापूर ठेवण्यात आले असून त्यांना या कालावधीत मुख्यालय सोडता येणार नाही असेही निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"