संसाराचा गाडा हाकत लग्नानंतर घेतलं शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:28 AM2021-09-08T04:28:40+5:302021-09-08T04:28:40+5:30
सोलापूर : मीनाक्षी तशी अभ्यासात पहिल्यापासूनच हुशार अन् जिद्दीही. म्हणूनच तिने लग्नानंतरही संसाराचा गाडा चालवत डी.एड., बी.एड. व एम.ए.चे ...
सोलापूर : मीनाक्षी तशी अभ्यासात पहिल्यापासूनच हुशार अन् जिद्दीही. म्हणूनच तिने लग्नानंतरही संसाराचा गाडा चालवत डी.एड., बी.एड. व एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अध्यापन करणाऱ्या मीनाक्षी तोडकर यांच्या आठवणी या जगातून जाताना नान्नजकरांना चटका लावून गेल्या.
बारावीपर्यंत आई- वडिलांकडे मंद्रूप येथे शिक्षण झालेल्या मीनाक्षीचा विवाह १९९९ मध्ये नान्नज येथील मामा अप्पाराव यांच्याशी झाला. तोडकर यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे त्यांनी नेटाने पुढचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. पती अप्पाराव यांनीही शिकविले. वडाळा येथील माउली महाविद्यालयात डी.एड., बी.एड. व नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मुलगी व मुलाचे शिक्षण सुरू असताना काही वर्षे लोकमंगल संकुलात, तर आता नान्नज येथील खासगी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून त्या काम करीत होत्या.
यातून त्या प्रपंचाला हातभार लावायच्या. मात्र, मीनाक्षीच्या डेंग्यूमुळे जाण्याने नान्नजकर भावुक झाले.
-----
शिक्षणात नेहमीच प्रथम
मीनाक्षी यांचे नान्नज हे मामाचे, तर मंद्रूप वडिलांचे गाव. लग्नानंतर नान्नजला आल्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले. वडाळा येथील माउली शिक्षण संकुलात डी.एड., बी.ए. व बी.एड. शिक्षण घेत असताना त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचा सतत सन्मान झाला.
-----
फोटो- ०७मीनाक्षी तोडकर-सत्कार
मीनाक्षी तोडकर यांचा सत्कार करताना उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, शेजारी बळीरामकाका साठे, माजी सरपंच राजाभाऊ साठे आदी.