ग्रामपंचायत निवडणुकीचा भाविकांच्या दर्शनावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:19 AM2021-01-14T04:19:05+5:302021-01-14T04:19:05+5:30
दर महिन्याच्या अमावस्येला भाविकांच्या गर्दीने फुलून जाणारा मंदिर परिसर या अमावस्या दिवशी तूरळक भाविक होते. त्यामुळे नारळ व ...
दर महिन्याच्या अमावस्येला भाविकांच्या गर्दीने फुलून जाणारा मंदिर परिसर या अमावस्या दिवशी तूरळक भाविक होते. त्यामुळे नारळ व पेढे विक्रीची लाखो रुपयांमध्ये होणारी उलाढाल देखील ठप्प झाली. जिल्ह्यात सर्वत्र असणारी ग्रामपंचायत निवडणूक, महिला वर्गाचा मकरसंक्रांत सण. त्यामुळे ही गर्दी कमी झाल्याचे नारळ व पेढे विक्रेते देविदास लेंगरे, प्रदीप शिवपूजे, ऋषिकेश मोरे, बाळासाहेब शिवपुजे यांनी सांगितले. तसेच खेळणी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, वाहन चालक यांच्या व्यवसायावर देखील झाला.
भाविकांना कपाळी गंध लावून उपजीविका करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना देखील या अडचणींना सामोरे जावे लागले.
फोटो
१३ वडवळ ०१
वडवळ येथे अमावस्या असूनही भाविकांची संख्या कमी झाली असून भाविकांच्या प्रतीक्षेत असलेले नारळ, पेढे विक्रेते व गंध लावणारी मुले.