लॉकडाऊनचा परिणाम; ट्रकची चाकं थांबली... रेल्वेची चाकं फिरु लागली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:30 PM2020-07-27T12:30:13+5:302020-07-27T12:33:00+5:30

एक वाहतूक सुरु तर दुसरी बंदच : मका, गव्हाची आयात तर चादरींची रेल्वेने होतेय निर्यात

Effect of lockdown; The wheels of the truck stopped ... the wheels of the train started spinning! | लॉकडाऊनचा परिणाम; ट्रकची चाकं थांबली... रेल्वेची चाकं फिरु लागली !

लॉकडाऊनचा परिणाम; ट्रकची चाकं थांबली... रेल्वेची चाकं फिरु लागली !

Next
ठळक मुद्देभुसार बाजारातून दररोज ५० ट्रक मालवाहतूक व्हायची जवळपास दररोजची ३० लाखांची उलाढाल ठप्प बाजारावर अवलंबून असणारे हजार हमाल, ५०० तोलार आणि ५०० चालक-वाहक अडचणीत सापडले सोलापुरातून जवळपास ७० लाखांच्या चादरी-टॉवेलची दररोज मालट्रकच्या माध्यमातून वाहतूक होत होती. आता ती रेल्वेच्या माध्यमातून सुरू झाली

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : लॉकडाऊनला काही घटकांनी व्यवसायाची संधी मानली तर काही उद्योग घटकांना घरघर ठरली आहे़ ट्रान्स्पोर्टने येणाºया मका आणि गव्हाची आयात तर चादरींची निर्यात ही चक्क १६ जुलैनंतर रेल्वेने सुरू झाली आहे़ सोलापुरात जवळपास ३५ हजार मालवाहतूक ट्रक-टेम्पो जागेवर थांबून असल्याने चालक, क्लीनरसह त्यावर अवलंबित असलेल्या अनेक घटकांची उपासमार सुरू आहे़ या व्यवसायाला चालना देणाºया सवलती शासनाने देण्याची मागणी मोटार मालक संघातून होत आहे.

सोलापुरात लॉकडाऊन काळात दुसºयांदा संचारबंदी अनुभवतोय़ जीवनावश्यक वस्तू वगळता इतर वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले़ परिणामत: सोलापूरच्या ट्रान्स्पोर्ट व्यवसायाचे मोठे नुकसान होत असून, असंख्य कुटुंबांची उपासमार होतेय, ती थांबवण्यासाठी संचारबंदी उठताच रेल्वे आणि एसटी महामंडळाच्या धर्तीवर ट्रान्स्पोर्टलाही ऊर्जितावस्था देणाºया योजना आखून त्या तत्काळ राबवण्याची मागणी मोटार मालक संघाच्या सदस्यांनी केली आहे.

सोलापुरी चादरींची रेल्वेने निर्यात 
सोलापुरातून दररोज ७० ट्रक चादर-टॉवेलची निर्यात सुरू होती़ लॉकडाऊन काळात याची निर्यात रेल्वे वॅगनने सुरू झाली़ पूर्व भागातून जवळपास ५३ ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून चादरी जात होत्या़ कोरोनामुळे पश्चिम बंगाल, मद्रास, बेंगलोर आणि उत्तर भारतातून सोलापुरी चादरीला मागणी वाढली आहे़ याशिवाय येथून काही औषधेही परराज्यात जात आहेत़ 


सोलापुरातून जवळपास ७० लाखांच्या चादरी-टॉवेलची दररोज मालट्रकच्या माध्यमातून वाहतूक होत होती. आता ती रेल्वेच्या माध्यमातून सुरू झाली आहे़ याचा खूप मोठा फटका मालवाहतूकधारकांना बसला आहे़ याला ऊर्जितावस्था देण्यासाठी हमाल, गोडावून कीपरला नव्याने पासेस वितरित करावेत़ 
- यशवंत साळुंखे 
संचालक, सोलापूर जिल्हा मोटार मालक संघ 

भुसार बाजारातून दररोज ५० ट्रक मालवाहतूक व्हायची़ जवळपास दररोजची ३० लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे़ या बाजारावर अवलंबून असणारे हजार हमाल, ५०० तोलार आणि ५०० चालक-वाहक अडचणीत सापडले आहेत़ या व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्यासाठी मालवाहतुकीवरील इन्शुरन्स दर कमी करावा़
- गोपाळ पोला,
संचालक, सोलापूर जिल्हा मोटार मालक संघ 

केळी, डाळिंब वाहतुकीला खूप मोठा फटका बसला आहे़ संचारबंदीनंतर गोडावून भाडे, टायरच्या किमती आणि आरटीओच्या विविध महसुलात सवलत द्यावी़ इंधनाचा वापर नसताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी असताना पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याऐवजी वाढवून ट्रान्स्पोर्टधारकांना अडचणीत आणले आहे़ 
- वसीमभाई इनामदार 
सदस्य, मोटार मालक संघ, मार्केट यार्ड 

Web Title: Effect of lockdown; The wheels of the truck stopped ... the wheels of the train started spinning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.