दुसऱ्या लाटेचा प्रभाव; पहिली लाट रोखलेल्या २२० गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 12:39 PM2021-04-29T12:39:18+5:302021-04-29T12:39:26+5:30

 लोकांची भीती कमी झाल्याचा परिणाम

The effect of the second wave; Infiltration of corona in 220 villages where the first wave was stopped | दुसऱ्या लाटेचा प्रभाव; पहिली लाट रोखलेल्या २२० गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव

दुसऱ्या लाटेचा प्रभाव; पहिली लाट रोखलेल्या २२० गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव

Next

सोलापूर: कोरोनाची पहिली लाट वेशीवरच रोखलेल्या २२० गावांमध्ये दुसऱ्या लाटेत कोरोनाने प्रवेश केला आहे. पहिल्या लाटेवेळी सतर्क झालेल्या नागरिकांची भीती कमी झाल्याने, बाधित भागात विविध कामांनिमित्त प्रवास केल्याने कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मार्च, २०२० नंतर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. १४ एप्रिल रोजी सोलापूर शहरात तर २४ एप्रिल रोजी ग्रामीण भागात पहिले रुग्ण आढळले. सप्टेंबर महिन्यापर्यंत पहिल्या लाटेचा प्रभाव दिसून आला. ऑक्टोबरनंतर हळूहळू रुग्ण कमी होत गेले. या काळात जिल्ह्यातील १ हजार २९ पैकी ७३६ गावांतच कोरोनाचा शिरकाव झाला. २९३ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले होते. डिसेंबरमध्ये कोरोनाची लाट कमी झाल्यावर लोक बिनधास्त झाले. जानेवारी व फेब्रुवारी, २०२१च्या काळात लोक कामानिमित्त बाहेरच्या गावात ये-जा करीत होते. त्याचबरोबर, पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा व बार्शी अशा तालुक्यात बाजूच्या जिल्ह्यातील लोकांची येजा मोठ्या प्रमाणावर सुरू होती.

फेब्रुवारीनंतर मुंबई व पुण्यात रुग्ण वाढू लागले. ही लाट जिल्ह्यातही आली. मार्चअखेर जिल्ह्यात संसर्ग वाढला. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हाभर कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले. यात कोरोनामुक्त असलेली २२० गावेही बाधित झाली. आता फक्त ७३ गावांमध्ये कोरोनाचा अद्याप शिरकाव झालेला नाही. कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा प्रभाव हळूहळू दिसून येईल, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

दुसऱ्या लाटेत ही वाचली आहेत गावे

दुसऱ्या लाटेत द. सोलापूर: वडगाव, गंगेवाडी, उळेवाडी, चिंचपूर, बाळगी, पिंजारवाडी, अक्कलकोट: आंदेवाडी, बिंजगेर, चिक्केहळ्ळी, धारसंग, डोंबरजवळगे, हिळ्ळी, इटगे, जक्कापूर, कुमठे, कोळीबेट, काळेगाव, मराठवाडी, ममदाबाद, महालक्ष्मीनगर, म्हेत्रे लमाणतांडा, नागोरे, परमानंदनगर, रामपूर, सेवालालनगर, शिरवळवाडी, शिरशी, सातनदुधनी, सेवालालनगर, सोळसे लमाणतांडा, विजयनगर, वसंतराव नाईकनगर, उ.सोलापूर: भागाईवाडी, करमाळा: म्हैसेवाडी, गुलमोहोरवाडी, सांगोला: गावडेवाडी, गुनपवाडी, पंढरपूर: सुगावखेड, जाधववाडी, खरातवाडी, नळी पटवर्धन, कुरोली, बार्शी: येमाईतांडा, भानसळे, आंबेगाव, भांडेगाव, चिंचखोपन, पिंपळगाव देशमुख, वाघाची वाडी, मंगळवेढा: शिवणगी, माळेवाडी, मोहोळ: सिद्धेवाडी, कुरणवाडी, भोयरे, मनगोळी, भैरववाडी, दाईंगडेवाडी, नांदगाव, तरटगाव, शिरापूर, जामगाव खुर्द, माढा: हरकरवाडी, चव्हाणवाडी,जामगाव, महादेववाडी, लोणी, शिंदेवाडी, जाधववाडी, खैरेवाडी, अंजनगावर खे., वडाचीवाडी बु., गारअकोले.

Web Title: The effect of the second wave; Infiltration of corona in 220 villages where the first wave was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.