बार्शीतील कोविड हॉस्पिटलच्या ऑक्सिजनसाठी प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:21 AM2021-04-25T04:21:29+5:302021-04-25T04:21:29+5:30

शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांवर उपचार करताना येत असलेल्या अडी-अडचणींवर मात करण्यासाठी आमदार राऊत हे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, अन्न व ...

Efforts continue for oxygen at Kovid Hospital in Barshi | बार्शीतील कोविड हॉस्पिटलच्या ऑक्सिजनसाठी प्रयत्न सुरू

बार्शीतील कोविड हॉस्पिटलच्या ऑक्सिजनसाठी प्रयत्न सुरू

Next

शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांवर उपचार करताना येत असलेल्या अडी-अडचणींवर मात करण्यासाठी आमदार राऊत हे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, अन्न व औषध प्रशासनमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व प्रशासनातील सर्वांसोबत सतत संपर्कात आहेत.

यासाठी २३ रोजी आमदार राऊत यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे फलटण येथील एमआयडीसीमधील सोना ॲलाॅय कंपनीच्या एमटीसी ग्रुपने बंद ऑक्सिजन प्लँट चालविण्यासाठी घेतला आहे. त्या प्लँटमधून तालुक्यासाठी ३०० ऑक्सिजन सिलिंडर मिळण्याची मागणी ई-मेलद्वारे पत्र पाठवून व फोनवर चर्चा करून केली आहे.

बार्शीचे नरेंद्र, संजय व मनोज मेहता बंधूंच्या एमटीसी ग्रुप सोना ॲलाॅय कंपनीने, लोणंद येथील बंद ऑक्सिजन प्लँट चालू करण्यास घेतला आहे. त्यावर सोमवारपासून उत्पादन चालू होणार आहे. त्याठिकाणी रोज २४०० ऑक्सिजन सिलिंडर तयार होणार आहेत. त्यातील बार्शी तालुक्‍यासाठी ३०० ऑक्सिजन सिलिंडर देण्याची मेहता कुटुंबाची इच्छा आहे. त्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत बार्शी तालुक्यास ते भरून आणण्यास परवानगी घ्यावी, अशी मागणी आमदार राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

---

Web Title: Efforts continue for oxygen at Kovid Hospital in Barshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.