‘जगदाळे ट्रॉमा युनिट’साठी निधी देण्यासाठी प्रयत्न : फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:28 AM2021-08-18T04:28:38+5:302021-08-18T04:28:38+5:30
बार्शी: जगदाळे मामा हॉस्पिटलमधून जनतेची सेवा घडत आहे. ट्रॉमा केअर सेंटरसाठी पीएम केअर फंडातून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, ...
बार्शी: जगदाळे मामा हॉस्पिटलमधून जनतेची सेवा घडत आहे. ट्रॉमा केअर सेंटरसाठी पीएम केअर फंडातून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मंगळवारी बार्शीत आले असता ते बोलत होते. फडणवीस यांना उद्देशून आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, मी माजी आमदार असताना तुम्ही पडत्या काळात खूप मदत केली. सत्ता असो नसो, कायम प्रामाणिकपणे तुमच्यासोबत आहे. मुख्यमंत्री असताना तुम्ही मोठा निधी दिला होता. जगदाळे मामांची शिवाजी संस्था ही बार्शीचे काळीज आहे.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, प्रशांत परिचारक,जयकुमार गोरे, राहुल कुल, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, धैर्यशील मोहिते-पाटील, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश पाटील, सभापती अनिल डिसले, अरुण बारबोले, डॉ. बी. वाय यादव, भाजपचे तालुकाध्यक्ष मदन दराडे, शहराध्यक्ष महावीर कदम, उद्योजक दिलीप गांधी, विजय राऊत, आप्पा राऊत, अभिजित राऊत उपस्थित होते.
------------
फोटो : १७ बार्शी २
बार्शीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजेंद्र राऊत, रणजितसिंह नाईक निंबाळकर, विजयकुमार देशमुख, प्रशांत परिचारक, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, समाधान आवताडे व राऊत फॅमिली.