सरड्याची अंडी उबवून दोन पिलांना जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 03:53 AM2020-08-15T03:53:15+5:302020-08-15T03:54:22+5:30
बांधकामासाठी खड्डा खोदत असताना तिथल्या बांधकाम कामगारांना जमिनीत काही अंडी दिसली.
सोलापूर : बांधकाम सुरू असताना आढळलेल्या सरड्यांच्या (गार्डन लिजर्ड) पाच अंड्यांना कृत्रिमरित्या उबविण्यात आले आहे. १५ दिवसानंतर दोन पिलांनी जन्म घेतला असून येत्या दोन दिवसात उर्वरित अंड्यांतूनही पिल्लं बाहेर येतील. एनसीएसएसचे (नेचर कॉन्झर्वेशन सर्कल) संतोष धाकपाडे यांनी शास्त्रीय पद्धतीने कृत्रिमरित्या ही अंडी उबविली. कुंभारी गावामधील मल्लिनाथ बिराजदार यांच्या घराचे बांधकाम सुरु होते. बांधकामासाठी खड्डा खोदत असताना तिथल्या बांधकाम कामगारांना जमिनीत काही अंडी दिसली.
खड्डा खोदत असल्याने काही अंडी दबून गेली तर काही अंडी तशीच राहिली होती. ही अंडी सापाची असतील या भीतीने कामगारांनी काढून फेकून देण्याचे ठरविले होते; मात्र ती वेगळी अंडी असल्याने तशीच ठेवण्यात आली.
कृत्रिमरीत्या उबविण्यासाठी अंडी भरणीत ठेवली. १५ दिवसानंतर त्यातून दोन पिल्ले बाहेर आली. नुकत्याच जन्मलेल्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. येत्या दोन दिवसात आणखी पिल्लं बाहेर पडतील.
वाळू, विटांचा केला वापर
प्लास्टिकच्या एका भरणीत अर्धी भरेल इतके वाळूचे मोठे खडे (चाळ) भरले. त्यावर अर्धा ग्लास पाणी, त्यावर विटांचे तुकडे, फरशीचे लहान तुकडे ठेवले आहेत.